ETV Bharat / city

Goa Assembly Election 2022 : छोटे पक्ष आणि अपक्षांच्या हातात असणार आहेत गोव्यातील सत्तेच्या चाव्या

author img

By

Published : Feb 20, 2022, 4:23 PM IST

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant ) यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असलेल्या साखळी मतदारसंघात यावेळी भाजप-काँग्रेसमध्ये ( Goa Assembly Election 2022 ) जोरदार टक्कर झाल्याचा अंदाज आहे. यात विजय कोणाचा होतो आणि साखळीचा अधिपती कोण, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Goa Assembly Election 2022
Goa Assembly Election 2022

पणजी - गोवा विधानसभेच्या (Goa State Assembly Election 2022) ४० जागांसाठी नुकतेच मतदान झाले. ३०१ उमेदवार रिंगणात आहेत. १० मार्चला मतमोजणी होईल, मात्र गोव्यात याही वेळी भाजपा आणि काँग्रेसने कितीही दावे केले तरी, स्पष्ट बहुमतापर्यंत कोणीच पोचणार नाही असे विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे आणि जाणकारांच्या मतांतून समोर येत आहे. गोव्यात याही वेळी सत्तेच्या चाव्या छोटे पक्ष आणि अपक्षांच्या हातात जातील असे एकंदरीत चित्र आहे. त्यामुळेच आतापासूनच भाजपा आणि काँग्रेसने सत्तेची गणिते जुळविण्यासाठी विजयी होऊ शकतील अशा संभाव्य लोकांवर लक्ष केंद्रित केले आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक पहिल्यांदा मनोहर पर्रीकर यांच्याशिवाय लढत आहे. त्यामुळे तगड्या नेतृत्वा अभावी भाजपा काय करेल हेही पाहण्यासारखे आहे.

राज्यात सात अपक्ष निवडून येतील असे अनुमान राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्यात प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, उत्पल पर्रीकर, आंतोन वाझ, आलेक्स रेजिनाल्ड, सावित्री कवळेकर आणि डॉ. चंद्रकांत शेट्ये या नावांचा समावेश असून इजिदोर फर्नांडिस आणि विल्फ्रेड डिसा यांची नाव चर्चेत आहेत. मगोप २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही चांगली कामगिरी करील अशी अपेक्षा आहे. या निवडणुकीत मगोपने तृणमूल काँग्रेसबरोबर युती करत १३ जागा लढवल्या. त्यापैकी ६ जागांवर त्यांनी विजयाचा दावा केला असून तृणमूलही काही जागा जिंकेल, असा अंदाज असून सत्ता स्थापनेत मगोप किंगमेकरची भूमिका बजावू शकतो.

हेही वाचा - Goa Assembly Election 2022 : पणजीत अटीतटीची लढाई

भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असलेल्या साखळी मतदारसंघात यावेळी भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर झाल्याचा अंदाज आहे. यात विजय कोणाचा होतो आणि साखळीचा अधिपती कोण, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या मतदारसंघातून तब्बल १२ उमेदवारांनी निवडणूक लढवली असली तरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना काँग्रेसचे धर्मेश सगलानी यांनी अक्षरशः घाम काढताना त्यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. यावेळी साखळी मतदारसंघात ८९.६४ टक्के मतदान झाले. पालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातही उत्स्फूर्तपणे मतदान झाले आहे. विजयी उमेदवाराला जेमतेम आघाडी मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. येथे वाढलेले मतदान भाजपा समोर धोक्याची घंटा वाजवून गेले आहे.

लढत अटीतटीची
यंदाची मडगावमधील लढत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांच्यात अटीतटीची झाली आहे. २०१७ मध्ये मडगावमध्ये मतदान ७८.७ टक्के झाले होते. या वेळेस त्यात ४ टक्क्यांनी घट झाली म्हणजेच एकूण मतदान ७४.८ टक्के झाले. एकूण २९,५०५ पैकी २२,०८२ एवढे मतदान झाले. बाबू आजगावकर हे मूळ मडगावचेच व मडगावांतच राहतात. त्यामुळे येथील जमिनीशी त्यांचे घट्ट नाते आहे. त्यामुळे प्रचार करताना त्याचा फायदा त्यांना झाला आहे. शहरी भागात कॉंग्रेसच्या दिंगबर कामत यांनी आपली पारंपरिक मते राखली असल्याचे चित्र आहे. या भागात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार महेश आमोणकर यांनी ज्या तीव्रतेने व गंभीरपणाने प्रचार केला. यांचा प्रभाव निकालावर परिणाम करणारा असू शकतो. आम आदमी पक्षाचे उमेदवार लिंकन वाज, रेव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाचे उमेदवार शशिराज नाईक शिरोडकर यांचा प्रचाराच्या काळात मतदारसंघामध्ये फारच कमी प्रभाव जाणवत होता.

८० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान
दक्षिण गोव्‍यातील सांगे, सावर्डे, कुडचडे व केपे या चारही खाणपट्ट्यांतील मतदारसंघांत यावेळी ८० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. दुसरीकडे उत्तर गोव्‍यातील मये, डिचोली, साखळी, थिवी, पर्ये या खाणपट्ट्यातही मोठ्या संख्‍येने मतदान झाले. हा वाढीव टक्का सत्ताधारी भाजपच्या विरोधात जाऊ शकतो असे जाणकारांचे मत आहे. भाजपने केवळ लोकांना आश्वासने देऊन झुलवत ठेवले. बंद पडलेल्या खाणी परत सुरू करण्यास काहीच प्रयत्न केले नाहीत. यामुळे सरकार विरोधात नाराजी होतीच तर या भागातहि नाराजी आहे.

हेही वाचा - गोवा विधानसभा निवडणूक २०२२ : गोव्यात भाजपा स्थिर सरकार देईल - प्रमोद सावंत

पणजी मतदारसंघाचे लक्ष
या निवडणुकीत पणजी मतदारसंघात सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. येथील भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांची धाकधूक वाढली आहे. या ठिकाणी त्यांच्या विरोधात उत्पल पर्रीकर हे अपक्ष उमेदवार उभे आहेत. माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर भाजपविरोधात बंड करत सामोरे आले आणि त्या बंडाची देशभरात एकच चर्चा सुरु झाली. उत्पल यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना पाठिंब्याचा ओघ सुरु झाला. उत्पल पर्रीकरांनी घरोघरी जात पणजीतील मतदारांना भावनिक साद घातली. आपणच मनोहर पर्रीकरांचा खरा वारसदार असल्याचं लोकांना पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

बाबूश मोन्सेराची धाकधूक

बाबूश यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांचा मुद्दा त्यांनी प्रचाराच्या केंद्रस्थानी आणला. त्यांना बाबूश याना संघवादी भाजपा कार्यकर्तांनी आतून पाठिंबा दिल्याची शक्यता आहे. बाबूश मोन्सेरात यांची धाकधूक यामुळेच वाढली आहे. मात्र गोव्याच्या राजकीय अभ्यासक स्नेहल जोशी या वेगळं मत मांडतात. त्या म्हणतात उत्पल हे पूर्णपणे त्यांच्या वडिलांच्या वारशावर अवलंबून आहेत, परंतु बाबूश लोकांना मदत करत आहेत, मोन्सेरात यांनी केलेले काम आणि लोकांना केलेली मदत पणजीत लोक विसरू शकत नाही. तसेच ते अडचणींना प्रतिसाद देत असतात आणि गरजेला नेहमीच तत्पर असतात. याचा फायदा त्यांना या निवडणुकीत नक्की होईल.

चर्चिल आलेमाव यांची शेवटची लढत
तृणमूल काँग्रेसचे बाणावली मतदारसंघाचे उमेदवार आमदार चर्चिल आलेमाव हे शेवटची निवडणूक लढवित आहेत. तसे त्यांनी जाहीर केले आहे. यामुळे या निवडणुकीत चर्चिल आलेमाव आणि त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष या दोघांचीही राजकीय पथ पणाला लागली आहे. बाणावली मतदारसंघात राज्यात सर्वांत कमी म्हणजे ७० टक्के मतदान झाले. त्यामुळे चर्चिल आपली ही शेवटची इनिंग यशस्वीपणे पूर्ण करतील, की या शेवटच्या डावात त्यांचा सपशेल पराभव होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकंदरीत गोव्याच्या बाबतीत पहिले असता आजवर येथील राजकीय गणिते नेहमीच पेचात पाडणारी ठरली आहेत. याही निवडणुकीत फार काही वेगळे होईल असे वाटत नाही. प्रस्थापित आणि दिग्गज लोकांना यावेळी मोठी धाकधूक वाटत आहे. पहिल्यांदा आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस गोव्यात उतरली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अस्थिर राजकारणाची गोव्याला परंपरा आहे. या वेळी नव्या कोणत्या अस्थिरतेला गोव्याला तोंड द्यावे लागते हे लवकरच समजेल.
हेही वाचा - Goa Assembly Elections 2022 : गोव्यात स्थिर सरकार येणे अशक्य - राजकीय विश्लेषक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.