ETV Bharat / city

वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे चार वाघांचा बळी : गोवा फॉरवर्डचा आरोप

म्हादई अभयारण्य क्षेत्रात गोळावली गावाजवळ वाघांचा संचार असल्याची माहिती असूनही गोव्याच्या वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखवला. त्यामुळे चार वाघांचा बळी गेला, असा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षातर्फे करण्यात आला आहे. त्याबरोबरच यासाठी कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवरच कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Four tigers were killed due to negligence of senior forest officials: Goa Forward
वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे चार वाघांचा बळी : गोवा फॉरवर्ड
author img

By

Published : Jan 10, 2020, 5:22 AM IST

पणजी - म्हादई अभयारण्य क्षेत्रात गोळावली गावाजवळ वाघांचा संचार असल्याची माहिती असूनही गोव्याच्या वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखवला. त्यामुळे चार वाघांचा बळी गेला, असा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षातर्फे करण्यात आला आहे. त्याबरोबरच यासाठी कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवरच कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

पणजीतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई म्हणाले, उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यातील गोळावली गावात चार दिवसांत चार वाघांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. यामधील मृत बछडे हे अजून सहा महिन्यांत पूर्ण वाढ होऊन मुक्त संचार करण्यासाठी तयार होणार होते. परंतु, या घटनेने गोव्याच्या पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. याला सरकारचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. सदर कृत्य करणाऱ्यांवर कायद्याने जी कारवाई होईल ती झालीच पाहिजे. परंतु, त्यांची संपूर्ण चौकशीही व्हायला पाहिजे.

पुढे ते म्हणाले, की 22 डिसेंबरला या गोळावली गावाच्या हद्दीत वाघाने एका गायीची शिकार केली. त्यानंतर 30 डिसेंबर 2019 ला एक म्हशीला ठार केले. याचा अर्थ येथे वाघाचा संचार होता. याची माहिती स्थानिक वनकर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना दिली होती. अधिकाऱ्यांनी याची दखल घेत वाघांच्या सुरक्षेची काळजी घेण्याऐवजी किती वाघ आहेत, हे पाहण्यासाठी कॅमेरे लावण्यास सांगितले. दरम्यान, वाघांच्या मृत्युची चौकशी वन्यजीव गुन्हा नियंत्रण संस्था आणि सीबीआय मार्फत करावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली.

म्हादई नदी परिसरात सदर घटना घडली आहे. हा भाग वाघांसाठी संरक्षित करावा, अशी अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत आहे. जर ते झाले असते, तर म्हादईचे पाणी वळविले नसते, असा आरोप प्रभुदेसाईंनी केला. तसेच, स्थानिक आमदार पर्यावरण संवर्धनासाठी सकारात्मक दिसत नाही. तसेच ते येथे वनधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांची सातत्याने बदली करण्यात येते अशीही माहीती त्यांनी दिली.

म्हादई अभयारण्य क्षेत्रासाठी वनविभाग आणि ग्रामस्थ यांची संयुक्त व्यवस्थापन समिती नाही. तसेच लोकांनी वन्यप्राण्यांशी कशाप्रकारे व्यवहार करावा याचीही माहिती स्थानिकांना दिली जात नाही, असे सांगून प्रभूदेसाई म्हणाले, सरकारने आपल्या कामकाजाची पद्धती बदलून मानव आणि वन्यजीव यांमधील संघर्ष टाळण्यासाठी लोकांना विश्वासात घेत तत्काळ उपाययोजना केल्या पाहिजेत.

हेही वाचा - महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्यांना घोषित रक्कम मिळाली नाही, काका पवारांच्या गौप्यस्फोट

Intro:पणजी : म्हादई अभयाण्यक्षेत्रात गोळावली गावानजीक वाघांचा संचार असल्याचे माहिती असूनही गोव्याच्या वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी निष्काळजी दाखवला. त्यामुळे चार वाघांचा बळी गेला, असा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षातर्फे करण्यात आला आहे. त्याबरोबरच यासाठी एखाद्या छोट्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवरच कारवाई करावी, अशीही मागणी केली आहे.

Body:पणजीतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई म्हणाले, उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यातील गोळावली गावात चार दिवसांत चार वाघांचा म्रूत्यू झाल्याचे उघड झाले आहे. यामधील म्रूत बछडे हे अजून सहा महिन्यांत पूर्ण वाढ होऊन मुक्त संचार करण्यासाठी तयार होणार होते. परंतु, या घटनेने गोव्याच्या पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. याला सरकारचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. सदर क्रूत्य करणाऱ्यांवर कायद्याने जी कारवाई होईल ती झालीच पाहिजे. परंतु, त्यांनी हे क्रुत्य का केले असेल याचाही विचार झाला पाहिजे.
आम्ही आज गोळावली गावाला भेट दिली. त्यावेळी अनेकांशी चर्चा केली. त्यामधून आम्हाला माहिती मिळाली, असे सांगून प्रभुदेसाई म्हणाले, 22 डिसेंबर 2019 रोजी या गावाच्या हद्दीत वाघाने एक गाय मारली. त्यानंतर दि. 30 डिसेंबर 2019 रोजी एक म्हैस मारली. याचा अर्थ येथे वाघाचा संचार होता. याची माहिती स्थानिक वनकर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना दिली होती. अधिकाऱ्यांनी याची दखल घेत वाघांच्या सुरक्षेची काळजी घेण्याऐवजी किती वाघ आहेत, हे पाहण्यासाठी कँमेरे लावून बघूया म्हणून सांगितले. दरम्यान, 3 किंवा 4 जानेवारी दरम्यान हा विषप्रयोग झाला असवा. म्हणजे जेव्हा समजले तेव्हा उपाययोजना केली असती. पंचनामा करून ज्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाले त्यांना योग्य नुकसान भरपाई तत्काळ दिली असती तर ही हानी टाळता आली असती. त्यामुळे आमची मागणी आहे की, या वाघांच्या म्रुत्यूची चौकशी वन्यजीव गुन्हा नियंत्रण संस्था आणि सीबीआय मार्फत करावी. कारण यामधील एका वाघाचा पंजा गायब आहे.
वाघांच्या म्रूत्यूची घटना म्हादई नदी परिसरात घडली आहे. हा भाग वाघांसाठी संरक्षित करावा, अशी अनेक वर्षांपासून चळवळ सुरू आहे. जर ते झाले असते तर म्हादईचे पाणी वळविले नसते, असा आरोप करतप्रभुदेसाई म्हणाले, मात्र, स्थानिक आमदार पर्यावरण संवर्धनासाठी सकारात्मक दिसत नाही. तसेच ते येथे वनधिकाऱ्यांना खूप दिवस टीकवूनही घेत नाहीत. अधिकाऱ्यांची सातत्याने बदली केली जाते.
या सर्वांवर कडी म्हणजे म्हादई अभयारण्य क्षेत्रासाठी वनविभाग आणि ग्रासस्थ यांची संयुक्त व्यवस्थापन समिती नाही. तसेच लोकांनी वन्यप्राण्यांशी कशाप्रकारे व्यवहार करावा याचीही माहिती स्थानिकांना दिली जात नाही, असे सांगून प्रभूदेसाई म्हणाले, सरकारने आपल्या कामकाजाची पद्धती बदलून मानव आणि वन्यजीव यांमधील संघर्ष टाळण्यासाठी लोकांना विश्वासात घेत तत्काळ उपाययोजना आखल्या पाहिजेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.