ETV Bharat / city

''लाँग टाइम नो सी’ सारख्या चित्रपटांचे चित्रीकरण वास्तविक स्थळीच केले पाहिजे'

विभक्त झाल्यानंतर ते नऊ वर्षांनी भेटले होते. त्यांचा प्रवास सुरुवातीपासून आठवण्यासाठी, त्यांच्या आयुष्याचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी त्यांचे सत्य, खेद आणि आठवणींचा सामना करण्यासाठी त्यांच्याकडे ऐंशी मिनिटे होती. थोडक्यात, ‘लाँग टाइम नो सी’ या फ्रेंच चित्रपटाच्या कथेचे वर्णन याप्रमाणे केले जाऊ शकते.

author img

By

Published : Jan 22, 2021, 4:58 PM IST

लघुपट लाँग टाइम नो सी न्यूज
लघुपट लाँग टाइम नो सी न्यूज

पणजी - विभक्त झाल्यानंतर ते नऊ वर्षांनी भेटले होते. त्यांचा प्रवास सुरुवातीपासून आठवण्यासाठी, त्यांच्या आयुष्याचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी त्यांचे सत्य, खेद आणि आठवणींचा सामना करण्यासाठी त्यांच्याकडे ऐंशी मिनिटे होती. थोडक्यात, ‘लाँग टाइम नो सी’ या फ्रेंच चित्रपटाच्या कथेचे वर्णन याप्रमाणे केले जाऊ शकते.

पियर फिल्मनद्वारा दिग्दर्शित 'लाँग टाइम नो सी' हा चित्रपट दोन व्यक्तींच्या जीवनात घडलेल्या बारकाव्यांची कथा आहे, थोड्या काळासाठी का नाही पण भूतकाळात हे दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे आणि अगदी अनपेक्षितरीत्या नऊ वर्षांनंतर ते रेल्वे स्टेशनवर भेटले आणि त्यांच्याकडे केवळ 80 मिनिटे होती. या चित्रपटाची पटकथा देखील पियर फिल्मन यांनी लिहिली आहे.

स्टुडीओमध्ये वास्तवाला मर्यादा असतात - दिग्दर्शक पियर फिल्मन

हेही वाचा - ईश्वराची कोणतीही निर्मिती मासिक पाळीमुळे अशुद्ध होत नसल्याचा संदेश देणारा' ब्रम्हा जननी गोपोन कोम्मोटी'

या चित्रपटाच्या लिखाणासाठी मला पाच वर्षाचा कालावधी लागला. परंतु, या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मला केवळ 5 दिवस पुरेसे होते. कारण यांचे चित्रीकरण लाँग शॉटमध्ये केले होते, असे फिल्मन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सध्या पणजी गोवा येथे 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. यामध्ये ते सहभागी झाले आहेत. महोत्सवाच्या वर्ल्ड पॅनोरामा विभागांतर्गत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

फिल्मन यांनी सांगितले की, ते तरुण असताना या चित्रपटाची पटकथा लिहायला सुरुवात केली होती. 'दोन जण रुग्णालयात भेटले, अशी पटकथा मी लिहिली होती. ते भेटले, प्रेमात पडले आणि त्यांच्यात काही उत्कट क्षण आले. परंतु, ते वेगळे झाले.'

चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी फिल्मन एका भावनिक प्रवासातून गेले होते. 'माझी पटकथा तयार होती. पण जेव्हा त्याची निर्मिती करण्याची वेळ आली, तेव्हा त्याच आशयाचा आणखी एक फ्रेंच चित्रपट आला आणि यामुळे माझा चित्रपट तिथेच गारद झाला. यातून बाहेर यायला मला अनेक वर्षे लागली.

अशा चित्रपटांचे प्रत्यक्ष ठिकाणी चित्रीकरण करण्यामागचे महत्त्व सांगताना फिल्मन म्हणाले, “पूर्णत: स्टुडिओमध्ये चित्रीकरण केलेला एक लघुपट मी बनविला होता. परंतु, अशा आशयाच्या चित्रपटांचे चित्रीकरण वास्तविक स्थळीच केले पाहिजे. कारण, स्टुडीओमध्ये चित्रीकरण करताना वास्तवाच्या काही मर्यादा असतात.”

हेही वाचा - सरफरोश-2 चित्रपटाची ही पाचवी पटकथा; ज्यावर केली निर्मिती : जॉन मॅथ्यू मथान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.