ETV Bharat / city

गडकरी पाठोपाठ देवेंद्र फडणवीसही गोव्यात दाखल होणार

महाराष्ट्र आणि गोवा एकाच संस्कृतीची दोन राज्ये, किंबहुना गोवा हा महाराष्ट्राचा कोंकण प्रांत. आणि याच गोव्याच्या प्रत्येक घडामोडी चा गेट वे महाराष्ट्रातूनच जातो मग तो प्रगतीचा असो, राष्ट्रीय महामार्ग किंवा रेल्वे मार्ग. गोव्याच्या निवडणुकीच्या युतीबाबत आज निर्णय घेतला जाणार आहे.

फडणवीस-गडकरी
फडणवीस-गडकरी
author img

By

Published : Nov 2, 2021, 9:17 AM IST

पणजी - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठोपाठ राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस आज दुपारी गोव्यात दाखल होणार आहेत. गडकरी व फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यात महाराष्ट्र गोमंतक पक्षाच्या युतीबाबत चर्चा होऊन त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. नोव्हेंबर महिन्यांच्या सुरुवातीपासूनच गोव्यातील राजकीय घडामोडींना रंग चढण्यास सुरुवात झाली आहे. भाजपसह सर्वच राजकीय पक्षांच्या राजकीय गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात कोणता पक्ष कोणाशी युती करून आगामी विधानसभा निवडणूक लढविणार याकडे लक्ष लावून आहे. अशी राजकीय घडामोड सत्ताधारी भाजपा आणि महाराष्ट्र गोमंतक पक्षाच्या गोटात सुरू झाली आहे. या दोन्ही पक्षात युती होण्याच्या शक्यता वर्तविल्या जात आहेत.

गडकरी पाठोपाठ देवेंद्र फडणवीसही गोव्यात दाखल होणार

महाराष्ट्राच्या नेत्यांवर युतीची जबाबदारी

महाराष्ट्र आणि गोवा एकाच संस्कृतीची दोन राज्ये, किंबहुना गोवा हा महाराष्ट्राचा कोंकण प्रांत. आणि याच गोव्याच्या प्रत्येक घडामोडी चा गेट वे महाराष्ट्रातूनच जातो मग तो प्रगतीचा असो, राष्ट्रीय महामार्ग किंवा रेल्वे मार्ग. गोव्याच्या निवडणुकीच्या युतीबाबत आज निर्णय घेतला जाणार आहे. आणि त्याची जबाबदारी पार पडणार आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस. गडकरी कालपासून गोव्याच्या दौऱ्यावर आहेत तर फडणवीस आज दुपारी गोव्यात दाखल होणार आहे.

गडकरी यांची संकटमोचकची भूमिका

गोव्याच्या स्वातंत्र्यानंतरही महाराष्ट्र गोमंतक पक्षाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाशी जोडली गेली आहेत, त्यामुळे येथील स्थानिक राजकीय नेत्यांचे चांगले संबंधही महाराष्ट्र राज्यातील नेत्यांशी आहेत, त्यातील एक उदाहरण म्हणजे नितीन गडकरी आणि ढवळीकर बंधू. या दोन्ही नेत्यांचे राजकीय मैत्रीपूर्ण संबंध आहेत, म्हणूनच २०१७ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करताना गडकरी यांच्या शब्दाला मान देऊन मगो पक्ष सत्तेत सहभागी झाला होता. त्यावेळी भाजपला बहुमतासाठी सात अतिरिक्त आमदारांची गरज होती तेव्हा मागोच्या तीन तर गोवा फॉरवर्ड व दोन अपक्षांनी साथ दिली होती. आणि यात गडकरी यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याप्रमाणे आजही मगोशी युतीच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी गडकरी व फडणवीस महत्वाची भूमिका निभावणार हे मात्र नक्कीच.

युतीत 12 जागांसाठी मगो आग्रही

महाराष्ट्र गोमंतक पक्षाच्या नेत्यानी नुकतीच गोव्यात ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. मात्र ममता बॅनर्जी यांनी राज्यात तृणमूल काँग्रेस 40 ही जागांवर आपल्या पक्ष्याच्या निशाणीवर उमेदवार उभे करणार आहेत, त्यामुळे युती झाल्यास मगोला त्यांचा पक्ष तृणमूल मध्ये विलीन करण्याच्या सूचना ममतांनी दिल्या होत्या. मात्र आपले प्रादेशिक पण जोपासण्यासाठी ढवळीकर यांनी यातून काढता पाय घेत भाजपा शी युती करण्यात आग्रही भूमिका घेतली आहे. 12 जागा दिल्यास आपण भाजपसोबत जाण्यास तयार असल्याचेही मगो ने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.