ETV Bharat / city

Deepak Kesarkar on Ed : आमच्यासाठी ईडीचे राज्य म्हणजे 'ई' एकनाथ आणि 'डी' देवेंद्र - दीपक केसरकर - ईडी दीपक केसरकर प्रतिक्रिया

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यामागे ईडीची चौकशी ( Sanjay Raut ED Summon ) लागली आहे. यावरून एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांनी त्यांना खोचक सल्ला दिला आहे. तुमच्यासाठी ईडीची चौकशी ( Deepak Kesarkar comment on Ed and Sanjay Raut ) लागली असेल तर तुम्ही पुरावे दाखवून मोकळे ( ED ) व्हा किंवा क्लिन चिट मिळवा, असा खोचक सल्ला शिवसेना बंडखोर गटाचे नेते दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांना दिला.

Deepak Kesarkar on Ed and Sanjay Raut
ईडी दीपक केसरकर प्रतिक्रिया
author img

By

Published : Jul 2, 2022, 6:56 AM IST

Updated : Jul 2, 2022, 8:58 AM IST

पणजी (गोवा) - आमच्यासाठी ईडीचे ( ED ) राज्य म्हणजे 'ई' एकनाथ शिंदे आणि 'डी' म्हणजे देवेंद्र फडणवीस असून त्यांच्या नेतृत्वात राज्याची प्रगती होणार असून, तुमच्यासाठी ईडीची चौकशी ( Sanjay Raut ED Summon ) लागली असेल तर तुम्ही पुरावे दाखवून मोकळे ( Deepak Kesarkar comment on Ed and Sanjay Raut ) व्हा किंवा क्लिन चिट मिळवा, असा खोचक सल्ला शिवसेना बंडखोर गटाचे नेते दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांना दिला.

माहिती देताना दीपक केसरकर

हेही वाचा - Chief Minister's Instructions : नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी टाळा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

तुम्ही दोशी नसाल तर तपासाला उत्तर द्या - राज्यात सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे राज्य आले असून त्यांच्या नेतृत्वात आम्हाला प्रगती करायची आहे. म्हणून तेच आमचे ईडी सरकार आहेत. मात्र, तुम्ही केलेल्या चुकांमुळे ईडी समोर तुम्हाला हजर व्हावे लागेल, तसेच ईडी तुमची योग्य ती चौकशी करेल, तिला सहकार्य करा. तुमची चूक नसेल तर तुम्हाला क्लिन चिट मिळेल. मात्र, ईडीच्या तपासाला सहकार्य करणे गरजेचे आहे, असा सल्ला दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांना दिला.

केसरकर यांनी संजय राऊतांच्या राजीनाम्याची केली मागणी - संजय राऊत हे आमचे नेते आहेत, मात्र त्यांनी आमच्याबद्दल केलेली जिवंत मृतदेह, मेलेले प्राणी, डुक्कर, हे शब्द आमच्या जिव्हारी लागले आहेत. आमच्या मतांवरच ते राज्यसभेचे खासदार झाले आहेत. शिवसेनेच्या आमदारांमुळेच त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे. जर ते आम्हाला अशा उपमा देत असतील तर त्यांनी आपली खासदारकी सोडावी, अशी मागणीही दीपक केसरकर यांनी केली आहे. संजय राऊत हे भले माणूस आहेत, त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी इतर पक्षातील आमदारांची मदत घेऊन पुन्हा एकदा राज्यसभेत निवडून यावे, असे थेट आव्हानही केसरकर यांनी राऊत यांना दिले.

संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी - ईडीने संजय राऊत ( Sanjay Raut ) यांना 1 जुलै रोजी कार्यालयात चौकशी करिता हजर राहण्याचे निर्देश दिले होते. काल संजय राऊत हे ईडी ( ED ) कार्यालयात दुपारी 12 वाजता चौकशी करिता दाखल झाले होते. संजय राऊत यांची पत्नी यांच्या खात्यामध्ये 55 लाख डीएसएफ बँकमधून आल्या प्रकरणात संजय राऊत यांच्या पत्नीची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. काल संजय राऊत यांची ईडीकडून दहा तास चौकशी करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमत्रिपदी - मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली ( Eknath Shinde Oath Maharashtra Chief Minister ) आहे. तर, मुख्यमंत्रिपदासाठी आधी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, अचानक आता देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली ( Devendra Fadnavis Oath DCM ) आहे.

हेही वाचा - Devendra Fadnavis : घोटाळे बाजांवर कारवाई झालीच पाहिजे; किरीट सोमय्या यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

Last Updated : Jul 2, 2022, 8:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.