ETV Bharat / city

काँग्रेस पक्ष फुटीमागे 'अराजकीय संघटित शक्ती'; गोवा सुरक्षा मंचचा आरोप

काँग्रेससारखा मोठा पक्ष फुटण्यामागे येथील राजकारणावर पकड ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या अराजकीय संघटित शक्तीचा हात आहे. तसेच या शक्तींनी भाजपच्या सत्ता पिपासूपणाचा फायदा उठवत यशस्वीरित्या भाजपवरच कब्जा मिळवला असल्याचा आरोप गोवा सुरक्षा मंचतर्फे करण्यात आला आहे.

author img

By

Published : Jul 12, 2019, 9:29 PM IST

काँग्रेस पक्ष फुटीमागे 'अराजकीय संघटित शक्ती'

पणजी - काँग्रेससारखा मोठा पक्ष फुटण्यामागे येथील राजकारणावर पकड ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या अराजकीय संघटित शक्तीचा हात आहे. तसेच या शक्तींनी भाजपच्या सत्ता पिपासूपणाचा फायदा उठवत यशस्वीरित्या भाजपवरच कब्जा मिळवला असल्याचा आरोप गोवा सुरक्षा मंचतर्फे करण्यात आला आहे.

पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाचे प्रमुख नेते सुभाष वेलिंगकर म्हणाले की मोठा पक्ष फोडणे हे भाजप नेत्यांना आपले यश वाटत आहे. पण संबंधित शक्तीमुळे केंद्रात वाढलेली भाजपची ताकद विचारात घेता गोवा भाजपला आपल्या इच्छा पुर्तीसाठी कसे गिळंकृत केल्या गेले हे लकवरच स्पष्ट होईल. योग्यवेळी गोसुमं (गोवा सुरक्षा मंच) संबंधित शक्तीचे पितळ उघडे करणार आहे. आजचा भाजप म्हणजे काँजपा (काँग्रेस जनता पार्टी) झाला आहे. त्यामुळे राज्यात एक छोटा काँग्रेस- एक मोठा काँग्रेस अस्तित्वात आले आहेत. भाजपने काँग्रेसला संपवले नाही. तर काँग्रेसी प्रवृत्तींनेच भाजपवर कब्जा केला आहे. हे पक्षाच्या स्थापनेच्या संकल्पनेचेच अधिपतन आहे. या प्रकारामुळे भाजपचे कॅडर संपून केवळ सत्तेचे लाळघोटे राहतील असाही आरोप त्यांनी केला.

पुढे बोलताना वेलिंगकर म्हणाले, 2017 च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे 27 आमदार निवडून येतील असे तत्कालीन नेते मनोहर पर्रीकर म्हणाले होते. परंतु 13 आमदार निवडून आले. मात्र, त्यांचे हे विधान विद्यमान भाजपनेते काँग्रेसवाल्यांची भरतीकरून पूर्ण करत आहेत. विविध प्रकारचे आरोप असलेल्यांच्या घाऊक प्रवेशासाठी भाजप हा धर्मशाळा झाला आहे. भाजपच्या 27 आमदारांपैकी 18 मुळ काँग्रेसमधील आहेत. तर एकुण आमदारांपैकी दोन त्रृतीयांश हे धार्मिक अल्पसंख्याक आहेत.

विरोधकांना संपविण्याच्या दृष्टीने सुरू असलेली भाजपची वाटचाल लोकशाहीसाठी घातक आहे, असा आरोप करत वेलिंगकर यांनी केला. तसेच आमदार आपल्या वैयक्तीक स्वार्थासाठी मतदारांचा विश्वासघात करत आहेत. भाजपने तर मागील दोन वर्ष फोडाफोडीचे राजकारण करत जनतेच्या समस्यांकडे दूर्लक्ष केले आहे. सरकारी तिजोरीत खणखणाट असून कर्ज काढून सरकार चालवले जात आहे. रोजगार निर्मिती झाली नाही. अशापरिस्थितीत गोव्याच्या राजकारणाला दिशा देण्याचे काम आता मतदारांनाच करावे लागणार आहे. यापुढे मतदारांची लायकी पणाला लागली तर गोव्याची लूट आणि अध:पतन थांबले, असेही ते म्हणाले.

Intro:पणजी : काँग्रेस सारखा मोठा पक्ष फुटण्यामागे गोवा मुक्ती नंतर येथील राजकारणावर पकड ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या 'अराजकीय संघटित शक्तीचा हात आहे. ज्यांनी भाजपच्या सत्ता पिपासूपणाचा फायदा उठलत अप्रत्यक्ष परंतु यशस्वीरित्या भाजपवर कब्जा मिळवला आहे, असा आरोप गोवा सुरक्षा मंचतर्फे करण्यात आला आहे.

Body:पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाचे प्रमुख नेते सुभाष वेलिंगकर म्हणाले, मोठा पक्ष फोडला हे भाजप नेत्यांना भले आपले यश वाटत असले तरी संबंधित शक्तीने केंद्रात वाढलेली भाजपची ताकद विचारात घेत गोवा भाजपला आपल्या इच्छा पुर्तीसाठी कसे गिळंकृत केले हे लकवरच स्पष्ट होईल. योग्यवेळी गोसुमं संबंधित शक्तीचे पितळ उघडे करणार आहे. आजचा भाजप म्हणजे काँजपा ( काँग्रेस जनता पार्टी) झाला आहे. त्यामुळे राज्य एक छोटा काँग्रेस- एक मोठा काँग्रेस अस्तित्वात आले आहेत. भाजपने काँग्रेसला संपवले नाही. तर काँग्रेसी प्रव्रूत्तींनेच भाजपवर कब्जा केला आहे. हे पक्षाच्या स्थापनेच्या संकल्पनेचेच अधिपतन आहे. या प्रकारामुळे भाजपचे केडर संपून केवळ सत्तेचे लाळघोटे राहतील असा आरोप केला.
पुढे बोलताना वेलिंगकर म्हणाले, 2017 च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे 27 आमदखर निवडून येतील असे तत्कालीन नेते मनोहर पर्रीकर म्हणाले होते. परंतु, 13 निवडून आले. मात्र, त्यांचे हे विधान विद्यमान भाजपनेते काँग्रेसवाल्यांची भरतीकरून पूर्ण करत आहेत. विविध प्रकारचे आरोप असलेल्यांच्या घाऊक प्रवेशासाठी भाजप धर्मशाळा झाला आहे. भाजपच्या 27 आमदारांपैकी 18 मुळ काँग्रेसमधील आहेत. तर एकुण आमदारांपैकी दोन त्रूतीयांश हे धार्मिक अल्पसंख्याक आहेत.
विरोधकांना संपविण्याच्या द्रूष्टीने सुरू असलेली भाजपची वाटचाल लोकशाहीसाठी घातक आहे, असा आरोप करत वेलिंगकर म्हणाले, आमदार आपल्या वैयक्तीक स्वार्थासाठी मतदारांचा विश्वासघात करत आहेत. भाजपने तर मागील दोन वर्ष फोडाफोडीचे राजकारण करत जनतेच्या समस्यांकडे दूर्लक्ष केले आहे. सरकारी तिजोरीत खणखणाट असून कर्ज काढून सरकार चालवले जात आहे. रोजगार निर्मिती झाली नाही. अशापरिस्थितीत गोव्याच्या राजकारणाला दिशादेण्याचे काम आता मतदारांनाच करावे लागणार आहे. यापुढे मतदारांची लायकी पणाला लागली तर गोव्याची लूट आणि अध:पतन थांबले, असेही ते म्हणाले.
यावेळी गोसुमं अध्यक्ष आत्माराम गांवकर, गोविंद देव, नवसो परवार, नितीन फळदेसाई आदी उपस्थित होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.