ETV Bharat / city

Assembly Election 2022 : गोव्यात काँग्रेसचे आमदार नजरकैदेत, निकालानंतर आमदार फुटण्याची भीती? - गोवा काँग्रेस उमेदवार नजरकैद

विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च ( Goa Assembly Election 2022 Result ) रोजी जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वी काँग्रेसने आपले उमेदवार नजरकैदेत ( Goa Congress Candidate House Arrest ) ठेवले आहेत. निकालानंतर आपले आमदार फुटतील या भीतीने काँग्रेसचे सर्व आमदार निगराणी खाली ठेवले आहे.

Congress Candidate House Arrest In Goa
Congress Candidate House Arrest In Goa
author img

By

Published : Mar 8, 2022, 3:06 PM IST

Updated : Mar 15, 2022, 4:23 PM IST

पणजी - विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च ( Goa Assembly Election 2022 Result ) रोजी जाहीर होणार आहे. मात्र, त्यापूर्वी काँग्रेसने आपले उमेदवार नजरकैदेत ( Goa Congress Candidate House Arrest ) ठेवले असून सत्ता स्थापन होईपर्यंत हे आमदार हॉटेलमध्ये नजरकैदेत राहणार आहेत.

अनेक वेळा एक्झिट पोल योग्य आकड्यांचा अंदाज लावत नाहीत. आम्ही ग्राउंडवर्क आणि आमच्या स्वतःच्या स्त्रोतांद्वारे आमचे स्वतःचे मूल्यांकन केले आहे. आम्हाला विश्वास आहे की काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळेल आणि गोवा फॉरवर्ड (पार्टी) सोबत आघाडी करून सरकार स्थापन करता येईल, अशी प्रतिक्रिाय काँग्रेस गोवा प्रभारी दिनेश जी राव यांनी दिली आहे.

निकालापूर्वीच काँग्रेसने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने मागील महिन्याभरामध्ये ज्या ज्या राज्यांमध्ये मतदान झाले. त्या ठिकाणी आपले महत्त्वाचे नेते पाठवले आहेत. पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश वगळता पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये काँग्रेसने आपले वरिष्ठ नेते पाठवले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भातील बैठक काही आठवड्यांपूर्वी घेतली. त्यामध्येच अशाप्रकारे निकालांच्या आधीच महत्वाचे नेते राज्यांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

दुसरीकडे काँग्रेसच्या या पवित्र्यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी टीका केलीय. काँग्रेसला यावेळीही त्यांचे आमदार पळून जातील याची भीती आहे. त्यामुळेच त्यांनी रिसॉर्ट पॉलिटिक्स करण्यास सुरुवात केल्याचे ते म्हणालेत. परवा निकाल आहे. मात्र आपला विजय निश्चित असल्याचे सावंत यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - OBC Reservation in MH : मराठा आरक्षणाप्रमाणे सरकारकडून ओबीसी आरक्षणाचे वाटोळे - प्रकाश आंबेडकर

Last Updated : Mar 15, 2022, 4:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.