पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सकाळी आठ वाजता ( Goa Election Result 2022 ) सुरुवात होणार आहे. इथे 14 फेब्रुवारी रोजी 40 जागांच्या विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान झालं होतं. निवडणुकीच्या निकालापूर्वी काँग्रेसने राज्यपालांकडे वेळ मागितला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांत जास्त मिळवूनदेखील काँग्रेस सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरली होती. मात्र, यावेळस काँग्रेसने सावध पवीत्रा घेतल्याचे दिसून येत आहे.
गोव्याचा राजकीय इतिहास पाहता, गोव्यात अनेकदा त्रिशंकू विधानसभा झाल्या आहेत. 1999 आणि 2012 विधानसभा निवडणूक निकाल याला मात्र अपवाद ठरले होते. 1999 मध्ये काँग्रेसला 21 तर भाजपला 2012 मध्ये 21 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर येथील पक्षांतराचे वातावरण आणि निवडणुकीनंतरचे नवे समीकरणं जुळत गेली आहेत.
गोवा विधानसभा निवडणूक 2017
- एकूण जागा : 40
- बहुमत: 21
- काँग्रेस: 17
- भाजपा: 13
- अपक्ष: 3
- महाराष्ट्रवादी गोमंतक: 3
- गोवा फॉरवर्ड पार्टी: 3
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: 1
हेही वाचा - Goa Election Result 2022 Live Update : गोव्याचा कौल कुणाला? मतमोजणीला सुरवात...