पणजी - इतर पक्षातून निवडून आलेले आमदार भाजपाला ( MLA of Goa ) सत्तेत साथ देण्यासाठी प्रत्येकी 100 कोटीत विकले गेले, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( CM Arvind Kejriwal ) यांनी केला. केजरीवाल दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर आहेत.
गोव्यात मुख्यमंत्री होण्यासाठी घोडेबाजार सुरू झाला होता. त्यासाठी प्रत्येक आमदारांचा दर ठरविला जात होता. हा दर 10 करोडपासून ते 100 करोड पर्यंत असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. केजरीवाल यांनी नुकतीच ओल्ड गोवा येथे आमरण उपोषण करणाऱ्या अमित पालयेकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे आरोप केलेत.