ETV Bharat / city

सिद्धी नाईकच्या मृत्यूमागे मोठ्या व्यक्तीचा हात; चर्चिल आलेमाव यांचा दावा - Goa Crime

सिद्धी नाईकच्या मृत्यू प्रकरणात आरोपी असणाऱ्या मोठ्या व्यक्तीला पोलीस आणि सरकार पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत, असा खळबळजनक आरोप बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी केला आहे. आलेमाव यांच्या बाणावली मतदारसंघात नुकताच दोन अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराचा मुद्दा संपूर्ण देशभर गाजला होता.

GOA
गोवा
author img

By

Published : Aug 18, 2021, 9:29 AM IST

पणजी - सिद्धी नाईक संशयास्पद मृत्यू प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. अद्याप पोलिसांना सिद्धीविषयी ठोस काहीच हाती लागलेले नाही. या प्रकरणाला आत्ता राजकीय वळण लागण्यास सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात सिद्धीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत उत्तर गोव्यातील समुद्र किनारी आढळून आला होता. मात्र, सिद्धीचा मृतदेह मिळाल्यानंतर तिचा बुडून मृत्यू झाला की तिच्यासोबत काही घातपात झाला, यावरून उलटसुलट चर्चा सूर आहेत. यातच उत्तर गोव्यात अनेक सामाजिक संघटनानी कँडल मार्च काढून तिच्या मृत्यूची सखल चौकशी व्हावी, अशी मागणी केली.

सीबीआय तपास व्हावा -

बाणावली मतदारसंघाचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी सिद्धीच्या मृत्यूबाबत खळबळजनक भाष्य करत, सिद्धीच्या मृत्यूमागे कोण्या बड्या व्यक्तीचा हात असून पोलीस आणि सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा केला.

सिद्धीला न्याय मिळावा -

नुकतीच आलेमाव यांच्या बाणावली मतदारसंघात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. यावर त्यांनी विधानसभेत आवाजही उठविला होता. पुन्हा एकदा सिद्धी नाईक प्रकरणावर बोलताना त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत राज्यात घडत असलेल्या महिलांच्या अत्याचाराबद्दल दुःख व्यक्त केले. सिद्धीला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली.

तपास क्राईम ब्रँचकडे द्यावा -

पोलीस तपास करत असून गरज पडल्यास आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे द्यावा, अशी मागणी करणार असल्याचे भाजपाचे मंत्री आणि कॅलनगुटचे आमदार मायकल लोबो यांनी म्हटलं.

काय प्रकरण?

सिद्धी नाईक ही 19 वर्षीय तरुणी 11 ऑगस्टच्या सकाळपासून बेपत्ता होती. म्हापसा येथील ग्रीन पार्क जंकशन येथून ती बेपत्ता झाली. सिद्धी पर्वरी येथे एका दुकानात काम करत होती. तिला तिच्या वडिलांनी गिरी म्हापसा येथे सकाळी साडेदहाच्या सुमारास खासगी बसने प्रवास करण्यासाठी सोडले होते. सिद्धी ग्रीन पार्क जंकशन येथून पर्वरी येथे जाणार होती. मात्र, वेळेत दुकानात न पोहोचल्याने दुकान मालकाने तिच्या घरी सांगितले. मात्र सिद्धीने आपला फोन घरीच ठेवला होता.दरम्यान सिद्धीच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार म्हापसा पोलिसात दाखल केली होती. बुधवारपासून बेपत्ता असलेल्या सिद्धी नाईक या तरुणीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत कलंगुट समुद्रकिनारी (गुरुवारी) सकाळी आढळून आला. शवविच्छेदन अहवालांतर हा मृत्यू समुद्रात बुडून श्वास गुदमरून झाल्याची माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना यांनी दिली आहे.

हेही वाचा - गोवा : कलंगुट समुद्रकिनारी आढळला तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह

हेही वाचा - गोवा: सिद्धी नाईक मृत्यू तपासावर पोलिसांची भूमिका संशयास्पद; कॉंग्रेसचा पोलीस स्टेशनला घेराव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.