ETV Bharat / city

ईश्वराची कोणतीही निर्मिती मासिक पाळीमुळे अशुद्ध होत नसल्याचा संदेश देणारा' ब्रम्हा जननी गोपोन कोम्मोटी' - मासिक पाळी निषिद्ध बाबी न्यूज

ईश्वराची कोणतीही निर्मिती केवळ मासिक पाळीमुळे अशुद्ध ठरत नाही, याचा संदेश आपला चित्रपट आपल्याला देतो, असे मत ‘ब्रम्हा जननी गोपोन कोम्मोटी’ या बंगाली चित्रपटातील मुख्य कलाकार ऋतांभरी चक्रवर्ती यांनी व्यक्त केले. तसेच, पुरुषांनी एकत्रितपणे पाऊल उचलले नाही तर, स्त्री-पुरुष समान असलेल्या समाजाची निर्मिती आपण करू शकणार नाही असे मत चित्रपटात विक्रमादित्य ही नायकाची भूमिका साकारणाऱ्या सोहम मुजुमदार यांनी व्यक्त केले.

गोवा इफ्फी ऋतांभरी चक्रवर्ती पत्रकार परिषद

author img

By

Published : Jan 19, 2021, 5:36 PM IST

Updated : Jan 19, 2021, 7:56 PM IST

पणजी - ईश्वराची कोणतीही निर्मिती केवळ मासिक पाळीमुळे अशुद्ध होत नाही, याचा संदेश आपला चित्रपट आपल्याला देतो, असे मत ‘ब्रम्हा जननी गोपोन कोम्मोटी’ या बंगाली चित्रपटातील मुख्य कलाकार ऋतांभरी चक्रवर्ती यांनी व्यक्त केले.

गोव्याची राजधानी पणजीमध्ये सध्या 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) सुरू आहे. यामध्ये इंडियन पॅनोरमा मधल्या फिचर फिल्म वर्गामध्ये 'ब्रम्हा जननी गोपोन कोम्मोटी' चित्रपट दाखवण्यात आला. त्यानंतर कथालेखिका झिनिया सेन, चक्रवर्ती आणि अभिनेता सोहम मुजुमदार यांनी पत्रकार परिषदेत चित्रपटाविषयी माहिती दिली. यावेळी दिग्दर्शक अरित्रा मुखर्जी, निर्माता शिबोप्रसाद मुखर्जी, पटकथाकार सम्राज्ञी बंडोपाध्याय हेही उपस्थित होते.

ईश्वराची निर्मिती मासिक पाळीमुळे अशुद्ध ठरत नसल्याचा संदेश देणारा' ब्रम्हा जननी गोपोन कोम्मोटी'

हेही वाचा - सरफरोश-2 चित्रपटाची ही पाचवी पटकथा; ज्यावर केली निर्मिती : जॉन मॅथ्यू मथान

इफ्फीसाठी आपल्या चित्रपटाची झालेली निवड हा चित्रपटाचा सन्मान आहे, असे सांगून चक्रवर्ती म्हणाल्या चित्रपटाचा विषय प्रत्येकाला आपलासा वाटणारा आणि मनोरंजक आहे. यामध्ये गंभीर विषयावर भाष्य करण्यात आले असले तरी तो आनंददायी आहे. महिलांना सर्वत्र भेदभावाला सामोरे जावे लागते. पुजारी असलेल्या महिलेची ही कथा आहे. स्त्रियांच्या मासिक पाळीला निषिद्ध मानण्याबाबतची समजूत नष्ट करण्याचा लेखिकेचा उद्देश असून या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारायला मिळाली, हा आपला सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

शबरी ही व्याख्याती, कलाकार आणि मुख्य म्हणजे पुजारी आहे. लग्नानंतर तिच्या जीवनातले अनेक बदल स्वीकारण्यासाठी तिला कसे झगडावे लागले आणि पुजारी म्हणून विधी सुरू ठेवण्यासाठीचे तिचे प्रयत्न या चित्रपटात विनोदी ढंगाने मांडण्यात आले आहेत. भारतीय समाजात मासिक पाळीला अद्यापही कसे निषिद्ध मानण्यात येते, याचे दर्शन घडवण्यावर चित्रपटाचा प्रामुख्याने रोख आहे. महिलांना प्रत्येक वेळी सुटकेची गरज नसते, आमच्याकडेही सांगण्यासाठी कथा असतात, असे त्यांनी नमूद केले.

ही कथा सांगण्याची गरज आहे असे मला जाणवले. मासिक पाळीमुळे धार्मिक विधीत भाग घेण्याला महिलेला नाकारण्यात आले. तिथून हा प्रवास सुरू झाला, असे पटकथा लेखिका झिनिया सेन यांनी सांगितले. हा आपला पदार्पणाचा चित्रपट असून या चित्रपटात आणखीही नवोदित असल्याचे त्या म्हणाल्या.

पुरुषांनी एकत्रितपणे पाऊल उचलले नाही तर, स्त्री-पुरुष समान असलेल्या समाजाची निर्मिती आपण करू शकणार नाही असे मत चित्रपटात विक्रमादित्य ही नायकाची भूमिका साकारणाऱ्या सोहम मुजुमदार यांनी व्यक्त केले. विक्रमादित्य हा आपल्या पत्नीला तिच्या प्रत्येक पावलावर पाठिंबा देतो. ते एकत्रित वाटचाल करतात असे त्यांनी आपल्या भूमिकेविषयी सांगितले.

हेही वाचा - राणा दग्गुबत्तीनिर्मित ‘मिशन फ्रंटलाईन‘ मधून बीएसएफ जवानांचा दृढनिश्चय व शौर्याला मानवंदना!

Last Updated : Jan 19, 2021, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.