पणजी : (Goa) देवेंद्र फडणवीस निवडणूक प्रभारी असताना भाजपने राज्यात 20 जागा जिंकून सत्ता स्थापन केली. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी डॉक्टर प्रमोद सावंत (Dr Pramod Sawant) यांची निवड झाली. त्याच्यानंतर अवघ्या चार महिन्यातच महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात हा सत्ता बदल झाला, हा सावंत यांचा पायगुण (BJP victory in Goa is a good sign for Maharashtra) असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या.
गोव्यात मोदी पुस्तकाचा अनावरण : मोदींच्या वीस वर्षीय राजकीय कारकीर्दीचा इतिहास उलगडणाऱ्या 'मोदी@20' या पुस्तकाचे अनावरण मंगळवारी संध्याकाळी राजधानी पणजीत झाले. याप्रसंगी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, भाजपा नेत्या चित्रा वाघ व्यासपीठावरती उपस्थित होते. यावेळी या पुस्तकाचा उलगडा करताना दत्तेश परुळेकर व गिरीराज वेर्णेकर यांनी या पुस्तकातील महत्त्वाच्या घडामोडींवर आपले विचार व्यक्त केले.
प्रमोद सावंतांचा पायगुण : देवेंद्र फडणवीस निवडणूक प्रभारी असताना भाजपने राज्यात 20 जागा जिंकून सत्ता स्थापन केली. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी डॉक्टर प्रमोद सावंत यांची निवड झाली. त्याच्यानंतर अवघ्या चार महिन्यातच महाराष्ट्र राज्यात हा सत्ता बदल झाला हा सावंत यांचा पायगुण असल्याचे, चित्रा वाघ म्हणाल्या. त्या गोव्यात मंगळवारी 'मोदी@20' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या.