ETV Bharat / city

गोव्यात नाराजांची बंडाळी भाजपला भोवणार.. आप अन् तृणमूलच्या प्रवेशाने गोव्याच्या राजकारणात रंगत - गोवा विधानसभा निवडणूक

गोव्यात विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी निवडणूक होत आहे. 2017 पर्यंत काँग्रेस, भाजप, महाराष्ट्र गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड या चार पक्षात असलेली लढतीत आत्ता आम आदमी पक्ष आणि तृणमुल काँग्रेसने उडी घेऊन राज्यातील निवडणुकीचे समीकरण अजूनच किचकट करून ठेवले आहे.

goa assembly election
goa assembly election
author img

By

Published : Nov 3, 2021, 4:36 PM IST

पणजी - राज्यातील पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या काँग्रेस आणि भाजपच्या लढाईत गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्र गोमंतक पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रादेशिक पक्ष सरकार बनविण्यात महत्वाची भूमिका बजावत होते. आता मात्र २०२२ मध्ये सत्तेत सहभागी होण्यासाठी आप आणि तृणमूल काँग्रेसने राज्याच्या राजकारणात प्रवेश केला आहे. या दोन्ही पक्षांनी प्रामुख्याने काँग्रेस आणि इतर पक्षातील नेत्यांना आपल्या गळाला लावायला सुरुवात केली आहे.

राज्यातील २०१९ पर्यंतची राजकीय परिस्थिती -

२०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक 17 जागा जिंकल्या होत्या. त्याखालोखाल भाजप 13, महाराष्ट्र गोमंतक पक्ष व गोवा फॉरवर्ड यांच्या प्रत्येकी 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर अपक्षांनी तीन जागा जिंकल्या होत्या.

..अन् भाजपने सत्ता स्थापन केली -

सर्वाधिक आमदार असतानाही काँग्रेसने सत्ता स्थापनेत विलंब केला. याचाच फायदा घेऊन महाराष्ट्र गोमंतक पक्ष व गोवा फॉरवर्डच्या साहाय्याने एका अपक्षाच्या मदतीने सरकार स्थापन केले. त्यात तत्कालीन केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

गोव्यात नाराजांची बंडाळी भाजपला भोवणार
2019 नंतर पर्रिकरांचे निधन आणि पुन्हा अस्थिर सरकार -

२०१९ ला मनोहर परिकर यांचे निधन झाले आणि तत्कालीन विधानसभा सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्र गोमंतक पक्ष सावंत याना डोईजड जायला लागला म्हणून राज्याच्या राजकारणात एका रात्रीत खेळ बदलला.

ती रात्र गोव्याच्या राजकारणात वळण घेणारी ठरली -

नेहमीप्रमाणे गोवेकर उठले असताना काँग्रेसचे 10 आणि महाराष्ट्र गोमंतक पक्षाच्या 2 आमदारांनी भाजपात प्रवेश करून राज्यात भाजपचे पूर्ण बहुमताने सरकार स्थापन झाले. पुढे या आमदारांना भाजपात दोन उपमुख्यमंत्री पदे, महत्वाची खाती व महामंडळ वाटप करण्यात आली.

एक नजर राज्यातील महत्वाचे पक्ष, नेते आणि त्यांचे आणि त्याच्या जवळील मतदारसंघ २०१९ नंतर आतापर्यंत राज्यांतील राजकारण स्थिर होते, मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आप आणि तृणमूलने प्रवेश केला. त्यामुळे विधानसभा निवडणूक समीकरण अधिकच किचकट झाले आहे.

भाजप- स्वतंत्र निवडणूक लढविणार किंवा गोमंतक पक्षाशी युती करणार.

काँग्रेस- स्वतंत्र निवडणूक लढविणार

गोवा फॉरवर्ड- तृणमुल काँग्रेस सोबत युती करून निवडणूक लढविनार.

राष्ट्रवादी- स्वतंत्र निवडणूक लढविणार किंवा तृणमुल सोबत जाणार

आप- स्वतंत्र निवडणूक लढविणार

महत्वाचे नेते आणि त्यांचे जवळील मतदारसंघ -
तिसवाडी तालुका
राजधानी पणजी हा भाजपचा बालेकिल्ला, मात्र २०१९ला काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या बाबुश मोंसरात हे पणजीचे आमदार आहेत तर त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी व अजून तीन आमदार त्यांचे समर्थक आहेत. राजधानी पणजीच्या जवळील चारही मतदारसंघावर बाबुश यांची पकड आहे. मात्र पणजी मतदार संघावर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल यांनी २०२२ ला दावा ठोकलाय. त्यांनी तसे सुचोवाच करत प्रचाराला सुरुवात केली. बाबुश आणि उत्पल यांच्यात दिवाळीच्या तोंडावर बॅनर युद्ध रंगले आहे.

बारदेश तालुका -
बारदेश तालुक्यावर मंत्री मायकल लोबो यांचे वर्चस्व आहे. ते स्वतः कॅलनगुटचे आमदार आहेत. तर 2022 ला त्यांना आपल्या पत्नी डिलियाना लोबो यांना शिवोलीम मधून निवडणुकीत उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले, मात्र त्याला भाजपचा अंतर्गत विरोध आहे. लोबोच्या पत्नीला तिकीट न मिळाल्यास ते कधीही भाजपची साथ सोडून कोणत्याही पक्षाच्या हातात हात देऊन निवडणूक रिंगणात उतरू शकतात तसे संकेतच त्यांनी काल दिले आहेत.

पेडणे तालुका -
पेडणे तालुका हा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा तालुका. मांद्रे मतदारसंघातून २०१७ ला पार्सेकर यांचा दयानंद सोपटे यांनी पराभव केला होता, पुढे सोपटे भाजपवासी झाले , मात्र सध्या सोपटे व पार्सेकर यांच्यात उमेदवारी वरून धुसफूस सुरू आहे. तर उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर पेडणे मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.

साखळी- बिचोलीम -
साखळीतून मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत व वाळपइ तुन आरोग्यमंत्री विश्वजित राणे निवडणूक लढणार आहेत हे दोन्ही भाजपचे मतदारसंघ मात्र सावंत राणे यांच्यात वेळोवेळी खटके उडत आहेत त्यातच राणे यांनी मुख्यमंत्री पदासाठी लॉबिंग सुरू केली तर राणे यांचे वडील माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे केव्हाही भाजपवासी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिरोडा - धारबंदोडा -
या विभागात महाराष्ट्र गोमंतक पक्षाचा चांगलाच प्रभाव आहे, मगोचे नेते सुदिन ढवळीकर आणि त्यांचे बंधू दीपक ढवळीकर २०२२ येथून निवडणुकीत उतरणार आहेत. येथून २०१७ ला मगोच्या तिकिटावर निवडून आलेले व पुढे भाजपवासी झालेले सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर याना मगोसोबत युती नको आहे. जर युती झाल्यास त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुरगाव तालुका -
मुरगाव तालुक्यावर भाजपची सत्ता आहे. राज्यातील बडे नेते म्हाव्हीन गुडीन्हो, मिलिंद नाईक याच तालुक्यातून विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात

सालसेट - मडगाव विभाग
येथे काँग्रेस व गोवा फॉरवर्ड पक्षाचा चांगलाच प्रभाव आहे. गोवा फॉरवर्ड चे नेते विजय सरदेसाई व माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत याच विभागातून विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात.

बाणवली -
बाणवली हा चर्चिल आलेमाव यांचा मतदारसंघ अलेमाव याच मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत तर त्यांची कन्या वालांका न्हवेलीम मतदारसंघातून निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहे, या दोन्ही मतदार संघावर तृणमुल आणि आपचे आव्हान अलेमाव यांना असणार आहे. नुकतेच काँग्रेसमधून तृणमूलवासी झालेले लुझिनो फलेरो व आपच्या उपाध्यक्ष प्रतिमा कुटीनहो याही न्हवेलीम मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

काणकोण कुंकळी विभाग -
काणकोण व कुंकळी हा ख्रिस्ती समाजाचा प्रभाव असलेला विभाग, येथून नेहमीच काँग्रेस आमदार विधानसभेत निवडून जातात. सध्या येथील भाजपवासी झालेले फिलिप्स नेरी रोद्रीगस व ईझींदोर फर्नांडिस हे मंत्री व विधानसभेचे उपसभापती आहेत. आलेक्स रेजिनाल्ड हे काँग्रेसचे आमदार. फिलिप्स नेरी व ईझींदोर फर्नांडिस यांना ही निवडणूक कठीण जाणार असल्याचे बोललं जातं आहे.

फोंडा तालुका -
फोंडा तालुक्यात माजी मुख्यमंत्री रवी नाईक काँग्रेसचा प्रभाव आहे. मात्र रवी नाईक भाजपात जाण्याच्या शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांचे सुपुत्र रितेश नाईक आधीच भाजपवासी झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.