ETV Bharat / city

Goa Assembly Election 2022 : माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलावर लपूनछपून प्रचार करायची वेळ - उत्पल पर्रीकरांना तिकीट नाकारली

भाजपाने नुकतीच पणजी मतदारसंघात जाहीर सभा घेतली होती. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, बाबुश मोन्सरात उपस्थित होते. यावेळी बाबुश यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या उत्पल पर्रीकर यांनी व्यासपीठावर येण्याचे टाळले होते. त्यानंतर त्यांनी 'आत्ता आपण मागे हटणार नाही' अशी पोस्ट करून भाजपाला आव्हान देण्याचा इशारा केला आहे.

लपूनछपून प्रचार करायची वेळ
लपूनछपून प्रचार करायची वेळ
author img

By

Published : Jan 8, 2022, 7:06 AM IST

पणजी - राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर परिकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे. त्यांना पणजी मतदारसंघातून ( Panaji Assembly Constituency ) भाजपाने तिकीट न दिल्याने स्वत:चा लपूनछपून प्रचार करण्याची वेळ आली आहे. भाजपाने बाबुश मोन्सरात यांना पणजीची उमेदवारी देण्याचे जाहीर केली आहे ( BJP Cuts Ticket of Utpal Parrikar ). त्यामुळे नाराज उत्पल पर्रीकर आपल्या निवडक कार्यकर्त्यांसोबत लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत.

माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलावर लपूनछपून प्रचार करायची वेळ

अंधारात घेताहेत लोकांच्या गाठीभेटी -

मनोहर पर्रीकर गोव्याच्या व देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाणारं नाव आहे. मात्र त्यांच्या मुलावर सध्या अंधारात प्रचार करायची वेळ आली आहे. भाजपाने उमेदवारी नाकारल्याने रात्रीच्या अंधारातच आपली भविष्यातील वाट शोधत आहेत. उत्पल पर्रीकर सध्या पणजी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यासाठी त्यांनी पक्षाकडे भाजपाच्या वतीने निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र पक्षाने बाबुश मोन्सरात यांना पणजीचे भावी उमेदवार असल्याचे जाहीर केले. परंतु आता मागे वळून पहायचे नाही, असे उत्पल यांनी ठरविले आहे. तशा आशयाची पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आता मागे हटणार नाही - उत्पल पर्रीकर

दरम्यान भाजपाने नुकतीच पणजी मतदारसंघात जाहीर ( Goa Assembly Election 2022 ) सभा घेतली होती. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, बाबुश मोन्सरात उपस्थित होते. यावेळी बाबुश यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या उत्पल पर्रीकर यांनी व्यासपीठावर येण्याचे टाळले होते. त्यानंतर त्यांनी 'आत्ता आपण मागे हटणार नाही' अशी पोस्ट करून भाजपाला आव्हान देण्याचा इशारा केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.