ETV Bharat / city

२ वर्षांत जाहीरनाम्यातील ८० टक्के वचने पूर्ण करणार - बाबूश मोन्सेरात

author img

By

Published : May 17, 2019, 1:22 PM IST

गेल्या २५ वर्षांपासून पणजी विधानसभा भाजपकडे होती. त्यांच्या आमदाराने विकास केला असता तर लोक माझ्या सभेला मोठ्या संख्येने जमले नसते. त्यामुळे पणजीचा प्रतिनिधी झाल्यास प्रत्येक कुटुंबात सरकारी नोकरी देईल, असे आश्वासन बाबूश मोन्सेरात यांनी दिले.

मळा-पणजी येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना पणजी विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात

पणजी - काँग्रेसने पणजीवासीयांकडून जाहीरनाम्यासाठी सूचना मागवल्या होत्या. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ५ हजारांहून अधिक सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यामधूनच छाननी करून जाहीरनामा तयार केला आहे. त्यामुळे विधानसभेत प्रतिनिधित्त्व करण्याची संधी दिल्यास पुढील २ वर्षांत यामधील ८० टक्के वचने पूर्ण करेल, अशी ग्वाही पणजी विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी आज दिली.

मळा-पणजी येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना पणजी विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात

मळा-पणजी येथे प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोन्सेरात बोलत होते. गेल्या २५ वर्षांपासून पणजी विधानसभा भाजपकडे होती. त्यांच्या आमदाराने विकास केला असता तर लोक माझ्या सभेला मोठ्या संख्येने जमले नसते. त्यामुळे पणजीचा प्रतिनिधी झाल्यास प्रत्येक कुटुंबात सरकारी नोकरी देईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

२४ मे ला गोव्यात काँग्रेसचे सरकार -

पाणी डोक्यावरून जात असल्याचे सरकारमधील घटकपक्षांना कळून चुकले आहे. त्यामुळे ते प्रचारात कुठेच दिसत नाहीत. येत्या २४ मे रोजी गोव्यात काँग्रेसचे सरकार असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजप उमेदवार कसा अपयशी आहे? तसेच तो भ्रष्टाचाराने बरबटलेला असल्याचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी सांगितले. तसेच भाजपचे हिंदू प्रेम कशाप्रकारे बेगडी आहे? हेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार कामत, आलेक्स रेजिनाल्ड, प्रतिमा कुतिन्हो, कवळेकर, मडकईकर यांनी बाबूश मोन्सेरात यांना मत देण्याचे आवाहन केले. यावेळी पणजी मतदारसंघातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:पणजी : पणजीवासीयांकडून जाहिनाम्यासाठी सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून पाच हजारांहून अधिक प्राप्त सूचनांमधून छाननी करून जाहीरनामा तयार केला. मला विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली तर पुढील दोन वर्षांत यामधील 80 टक्के वचन पूर्ण करेन, अशी ग्वाही बाबूश मोन्सेरात यांनी आज दिली. पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार आहेत.

Body:मळा-पणजी येथील मारूतीराय देवस्थानच्या पायथ्याजवळील मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या जाहीर प्रचारसभेसाठी गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, माजी मुख्यमंत्री तथा आमदार दिगंबर कामत, फ्रान्सिस सिल्वेरा, फिलिप नेरी रॉड्रिग्ज, जेनिफर मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर, महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना मोन्सेरात म्हणाले, पणजी विधानसभा मागील 25 वर्षे भाजपकडे होती. त्या आमदाराने विकास केला असता तर लोक माझ्या सभेला मोठ्या संख्येने जमले नसते. त्यामुळे पणजीचा प्रतिनिधी झालो तर प्रत्येक कुटुंबात सरकारी नोकरी देण्याचे वचन देतो. पणजीचा विकास करण्यात आला असेल तर बाहेरील व्यक्ती प्रचाराला बोलवावी लागली नसती. माझ्या प्रचार सभेला जर मला अशी व्यक्ती बोलवावी लागत असेल तर ते माझे अपयश आहे.
पणजी पोटनिवडणूक प्रचारात सरकारमधील घटकपक्ष दिसत नाही हे हेरून बोलताना मोन्सेरात म्हणाले, सरकारमधील आज घटकपक्षांन कळून चुकले आहे की, पाणी डोक्यावरून जात आहेत. त्यामुळे ते प्रचारात कुठेच दिसत नाहीत. येत्या 24 मे रोजी गोव्यात काँग्रेसचे सरकार असेल.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी भाजप उमेदवार कसा अपयशी आहे आणि भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे हे मांडताना भाजपच्या दुटप्पीपणावरही जोरदार टीका केली. तसेच भाजपचे हिंदू प्रेम कशाप्रकारे बेगडी आहे हे सांगितले.
यावेळी आमदार कामत, आलेक्स रेजिनाल्ड, प्रतिमा कुतिन्हो, कवळेकर, मडकईकर यांनी बाबूश मोन्सेरात यांना मत देण्याचे आवाहन केले. सभेला पणजी मतदारसंघातील लोक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
....
व्हीडीओ - गिरीश चोडणकर

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.