ETV Bharat / city

Arvind Kejriwal in Goa : 'निकालानंतर काँग्रेसचे आमदार भाजपात गेले नाही, तर आघाडीसाठी विचार करू' - अरविंद केजरीवाल - आम आदमी पक्ष

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (AAP's Arvind Kejriwal) यांनी गोव्यात प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेससोबत आघाडी ( Arvind Kejriwal on post-poll alliance ) करण्यासंदर्भात विचार करू, असे उत्तर दिले.

Arvind Kejriwal  in Goa
अरविंद केजरीवाल
author img

By

Published : Feb 4, 2022, 12:25 PM IST

Updated : Feb 4, 2022, 3:01 PM IST

पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) प्रचारासाठी सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी गोव्यात सभा घ्यायला सुरुवात केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (AAP's Arvind Kejriwal) यांनी गोव्यात प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्यासंदर्भात विचार करू, असे उत्तर दिले.

  • #WATCH | Speaking on post-poll alliance for #GoaElections2022, Delhi CM & AAP national convener Arvind Kejriwal speaks on prospects of forging an alliance with Congress. He says, "We'll think about it if Congress MLAs remain in the party, they all will go to BJP within 24 hours." pic.twitter.com/GUNow4AF8k

    — ANI (@ANI) February 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गोवा विधानसभा निकालानंतर जर काँग्रेससोबत आघाडी करणार का, या प्रश्नावर केजरीवाल यांनी म्हटलं, की निकालानंतर 24 तासांच्या आत काँग्रेसचे आमदार भाजपात जावून सामिल होतील. जर तसे नाही झाले, तर आघाडीवर विचार करू. यासोबत त्यांनी पंजाब विधानसभेवरदेखील भाष्य केले. एखाद्या व्यक्तीला भष्ट्राचार करण्यासाठी 4 ते 5 वर्ष लागतात. पण, पंजाबच्या नव्या मुख्यंत्र्यांनी फक्त 111 दिवसांत भष्ट्राचार केला आहे. पंजाबची जनता पाहत असून त्यांना इमानदार सरकार हवे आहे, असेही केजरीवाल म्हणाले.

  • #WATCH | It takes people 4-5 yrs to do corruption, he(Punjab CM)did wonders within 111 days itself. Unfortunate! People are watching, want honest govt: Delhi CM Arvind Kejriwal in Dona Paula (Goa) on arrest of Punjab CM's nephew Bhupinder S Honey by ED in illegal sand mining case pic.twitter.com/VxVxqyTxmx

अरविंद केजरीवाल यांनी गोवा येथील दाबोलीम येथील गणपती मंदिराला भेट दिली आणि प्रार्थना केली. "आम्ही या मंदिरात गोवा आणि देशाच्या सुखासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आसो आहोत. प्रेमानंद बाबू नानोस्कर 'आप'च्या वतीने निवडणूक लढवत आहेत... त्यांना बहुमत द्या," असे ते म्हणाले.

  • AAP national convenor Arvind Kejriwal visits & offers prayers at Ganpati Temple in Dabolim, Goa

    "We're in this temple to pray for Goa & country's happiness & health. Premanand Babu Nanoskar is contesting on AAP's behalf...give him a majority of votes," he said#GoaElections2022 pic.twitter.com/mBhuMwGEal

गोव्यात आपकडून जातीय समीकरण -

आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी अमित पालेकर ( Goa AAP CM Candidate Amit Paleka ) या भंडारी समाजाच्या उमेदवाराला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करून जातीय समीकरण जुळवायला सुरुवात केली आहे. गोव्यात ओबीसी समाजात भंडारी जातीचे प्रमाण 60 टक्के आहे. गोव्यातील अठरा मतदारसंघांवर ओबीसी समाजातील भंडारी या जातीचा प्रभाव असल्याची चर्चा आहे. हीच बाब हेरून आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भंडारी समाजाचा उमेदवार मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करून नवीन गणित मांडली. गोव्यात कधीही यापूर्वी जातीय गणितांवर निवडणूक लढवली गेली नाही. पहिल्यांदाच ही निवडणूक जातीय गणितांवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गोव्याचे राजकारण....

गोवा विधानसभा निवडणूक 2022 (Goa Assembly Election 2022) साठी बिगुल वाजले आहेत. गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अनेकवेळा गोव्यात त्रिशंकू विधानसभा (Hung Assembly in Goa) झाली होती. मात्र, यावेळी त्रिशंकू होणार की भाजपला पूर्ण बहुमत मिळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. गोवा विधानसभा निवडणूक 2022 साठी व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार (Goa to vote on February 14) आहे. गोव्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन होणार की त्रिशंकू विधानसभा होणार हे 10 मार्चला कळणार आहे.

हेही वाचा - Goa Assembly Election: गोव्याच्या राजकारणात महिलांना नगण्य स्थान

Last Updated : Feb 4, 2022, 3:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.