ETV Bharat / city

गोव्यात अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा प्रियकर शुभम देगडेसह बुडून मृत्यू, खाडीत पडली कार - pune ishwari deshpande dies goa

पुण्यातील शुभम देडगे आणि ईश्वरी देशपांडे हे मागच्या बुधवारपासून गोव्यात फिरायला आले होते. सोमवारी पहाटे पार्टी करून परतत असताना त्यांच्या गाडीवरील ताबा सुटून गाडी थेट खाडीत कोसळली. नेमकी याच वेळी भरतीची वेळ असल्यामुळे गाडी खोल पाण्यात कोसळल्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

actress shubham dedge dies in car accident with her boyfriend in goa
पुण्यातील अभिनेत्रीचा प्रियकरासह अपघातात मृत्यू
author img

By

Published : Sep 21, 2021, 2:58 PM IST

Updated : Sep 21, 2021, 7:58 PM IST

बागा (पणजी) - कॅलनगुट येथील खाडीत कार कोसळून पुण्यातील अभिनेत्री ईश्वरी देशपांडे व शुभम देडगे या प्रेमिकांचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास पार्टी करून परतत असताना हा अपघात घडला. भरतीच्या वेळी खाडीत पाणी असल्याने दोघांचाही अपघातानंतर बुडून मृत्यू झाला.

मागच्या बुधवारपासून होते गोव्यात -

पुण्यातील शुभम देडगे आणि ईश्वरी देशपांडे हे मागच्या बुधवारपासून गोव्यात फिरायला आले होते. सोमवारी पहाटे पार्टी करून परतत असताना त्यांच्या गाडीवरील ताबा सुटून गाडी थेट खाडीत कोसळली. नेमकी याच वेळी भरतीची वेळ असल्यामुळे गाडी खोल पाण्यात कोसळल्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ईश्वरी देशपांडे हिने अलीकडेच एका मराठी व हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण केले होते.

हेही वाचा - पोलिसांचा लॉजवर छापा; रुमधील टनेलमध्ये लपवल्या होत्या महिला, पाहा VIDEO

...तोपर्यंत उशीर झाला होता -

शुभम आणि ईश्वरीच्या गाडीचे सेंट्रल लॉकमुळे गाडीतच अडकले होते. त्यांच्या नाकातोंडात पाणी घुसल्यामुळे त्यांच्या प्राथमिक उपचारासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या सहकार्याने गाडीसह दोघांचे मृतदेह बाहेर काढले.

पुढच्या महिन्यात होता दोघांचा साखरपुडा -

ईश्वरी देशपांडे आणि शुभम देडगे यांची काही वर्षांपासून मैत्री होती. त्यातूनच त्यांची मने जुळली होती. त्यामुळे पुढच्या काही महिन्यात साखरपुडा झाल्यावर दोघेही विवाहबंधनात अडकणार होते. मात्र, नियतीने त्यांच्यावर आधीच घाला घातला.

Last Updated : Sep 21, 2021, 7:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.