पणजी - 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज शनिवार (दि.16) ताळगाव पठारावरील गोवा विद्यापीठाच्या डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिममध्ये होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुदीप संजीव (सुदीप) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. तर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, यावर्षीचा इफ्फी हायब्रीड पद्धतीने होणार आहे. ज्यामुळे रसिकांना प्रत्यक्ष उपस्थित राहून तर काहींना ऑनलाइन पद्धतीने याचा आस्वाद घेता येणार आहे. यावर्षी 16 देश सहभागी झाले आहेत. 7 चित्रपटगृहात 159 चित्रपट दाखवले जातील. ज्यामध्ये 85 आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्रीमियर असतील. कंट्रीफोकस म्हणून बांगलादेशचा सहभाग आहे. जीवनगौरव पुरस्कार इटालियन कलाकार व्हिकेरिजल स्टुरिओ यांना प्रदान करण्यात येईल. महोत्सवात गर्दी टाळण्यासाठी केवळ 950 प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय ग्रुहमंत्रालयाने जारी केलेल्या महामारी संदर्भातील सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात येईल. मास्क शिवाय कोणालाही प्रवेश नसेल.
![51st edition of IFFI to begin in Goa](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-goa-02-iffi-inogural-cm-esg_15012021215144_1501f_1610727704_94.jpg)
![51st edition of IFFI to begin in Goa](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-goa-02-iffi-inogural-cm-esg_15012021215144_1501f_1610727704_739.jpg)
ओपनिंग राऊंडने पडदा उठेल
महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना गोवा मनोरंजन संस्थेचे सचिव अमित सतिजा म्हणाले, ओपनिंग राऊंडने महोत्सवाची सुरुवात होईल. तर वाईफ ऑफ स्पाय चित्रपटाने सांगता होईल. इंडियन पँनोरमाची सुरुवात सांड की आँखने होईल. इफ्फी गोवा 2020 साठी 2500 लोकांनी नोंदणी केली होती. तळ आतापर्यंत 1456 जणांनी प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. गर्दी टाळण्यासाठी खुल्या जागेतील अथवा महोत्सव परिसराबाहेर आयोजित करण्यात येणारे मनोरंजनात्मक कार्यक्रम यावर्षी होणार नाहीत. दोन खेळांदरम्यान अंतर ठेवून चित्रपटगृह सॅनिटायझ करण्यात येईल. तर बहुतेक सेलिब्रिटी ऑनलाइन पद्धतीने सहभागी होणार आहेत.
![51st edition of IFFI to begin in Goa](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-goa-02-iffi-inogural-cm-esg_15012021215144_1501f_1610727704_472.jpg)
इएसजी परिसरात झगमगाट
इफ्फी गोवा मनोरंजन संस्थेच्या (इएसजी) परिसरात होणार असल्याने परिसराला आकर्षक पद्धतीने विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. दयानंद बांदोडकर रस्ता, इमँक्युलेट चर्च परिसर,मांडवी पूल यांना सजविण्यात आले आहे.
हेही वाचा - ''बाबरवर एफआयआर दाखल करा'', लाहोर न्यायालयाचा आदेश