पणजी - कोरोनामुळे अनेक नागरिकांना फटका बसला असून अनेकांची आर्थिक परिस्थिती चिंताजनक बनली आहे. यातच अनेक पालकांसमोर मुलांच्या शैक्षणिक शुल्काचा प्रश्न भेडसावत आहे. यातून राज्य सरकारने पालकांना दिलासा देत चालू वर्षातील महाविद्यालयीन शैक्षणिक शुल्कात 50 टक्के सूट देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यात ट्युशन फी, जिमखाना शुल्क यात सरकारने विद्यार्थ्यांना 50 टक्के सवलत दिली आहे.
40 हजार विद्यार्थ्यांना होणार फायदा -
राज्यातील शिक्षण संचालनालयांतर्गत येणाऱ्या 36 महाविद्यालयातील 40 हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. राज्यातील बीएस्सी, बीकॉम आणि बीए शाखेतील विद्यार्थी या शैक्षणिक शुल्क सुविधेसाठी पात्र ठरणार आहेत.
शिक्षकांच्या दुसऱ्या डोससाठी केंद्राकडून मार्गदर्शन -
राज्यातील शाळा लवकरच सुरू करणार असून राज्यात येणार आहेत. अनेक शिक्षकांनी पहिला डोस घेतला असून राज्यातील शिक्षकांना 30 दिवसांनंतर दुसरा लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे, त्यासाठी केंद्राकडून रीतसर परवानगी व मार्गदर्शन घेणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
नेटवर्कअभावी ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा -
सध्या सरकारने राज्यात ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ग सुरू केले आहेत. मात्र, राज्यात नेटवर्क अभावी या ऑनलाईन वर्गाचा खेळखंडोबा झाला आहे. याविषयी महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे नेते सुधीन ढवळीकर यांनी पावसाळी अधिवेशनात आवाजही उठविला होता. मात्र, सरकारचा कारभार जैसे थेच आहे.
हेही वाचा - दर्ग्याला गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा तलावात बुडून मृत्यू