ETV Bharat / city

पणजी: 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनाचा केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी घेतला आढावा

स्पर्धेत एकूण 37 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. त्यापैकी दोन क्रीडाप्रकार दिल्ली येथे घेण्यात येतील. तर, उर्वरीत 35 क्रीडाप्रकार राज्यात होतील. केंद्रीय मंत्र्यांनी आज सचिवालयात झालेल्या बैठकीत तयारीचा आढावा घेतला. 28 फेब्रुवारी पर्यंत सर्व स्टेडिअम सुसज्ज असतील, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले.

36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
author img

By

Published : Jan 19, 2020, 2:19 AM IST

Updated : Jan 21, 2020, 10:23 AM IST

पणजी - केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरण रिजीजू यांनी शनिवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत आयोजित बैठकीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनाचा आढावा घेतला. गोव्यात 20 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर 2020 या काळात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

36th national games planning meeting panji, goa
आढावा बैठक

हेही वाचा - 'असे' आहे साईबाबांचे पाथरीतील जन्मस्थळ; जातं, उखळ अन् बरंच काही...

स्पर्धेत एकूण 37 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. त्यापैकी दोन क्रीडाप्रकार दिल्ली येथे घेण्यात येतील. तर, उर्वरीत 35 क्रीडाप्रकार राज्यात होतील. केंद्रीय मंत्र्यांनी आज सचिवालयात झालेल्या बैठकीत तयारीचा आढावा घेतला. 28 फेब्रुवारी पर्यंत सर्व स्टेडिअम सुसज्ज असतील, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. तसेच 31 ऑगस्ट पर्यंत स्पर्धेसाठीची सर्व साधने स्टेडिअम आणि इतर ठिकाणी तयार असतील. स्पर्धेदरम्यान लागणाऱ्या 71 प्रमुख सेवांसाठीच्या कंत्राटाची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले.

हेही वाचा - 'कोणाची व्यक्तिगत विधाने सरकारची असू शकत नाहीत'

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडिअम बांबोळी, बी. के. एस. स्टेडिअम म्हापसा, टिळक मैदान मडगाव आणि जवाहरलाल नेहरु स्टेडिअम फातोर्दा याठिकाणी प्रमुख क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यात आयोजित करणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा संस्मरणीय ठरतील, असे किरण रिजीजू म्हणाले. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून राज्याला स्पर्धेच्या आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी बैठकीत सांगितले.

Intro:पणजी : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) किरण रिजीजू यांनी आज मुख्यमंत्री डॉ प्रमोद यांच्यासमवेत आयोजित बैठकीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनाचा आढावा घेतला. गोव्यात 20 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर 2020 या काळात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. Body:
स्पर्धेत एकूण 37 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. त्यापैकी दोन क्रीडाप्रकार दिल्ली येथे घेण्यात येतील. तर, उर्वरीत 35 क्रीडाप्रकार राज्यात होतील. केंद्रीय मंत्र्यांनी आज सचिवालयात झालेल्या बैठकीत तयारीचा आढावा घेतला. 28 फेब्रुवारी पर्यंत सर्व स्टेडिअम सुसज्ज असतील, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. तसेच 31 ऑगस्ट पर्यंत स्पर्धेसाठीची सर्व साधनं स्टेडिअम आणि इतर ठिकाणी तयार असतील. स्पर्धेदरम्यान लागणाऱ्या 71 प्रमुख सेवांसाठीच्या कंत्राटाची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले.

डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडिअम-बांबोळी, बी के एस स्टेडिअम-म्हापसा, टिळक मैदान- मडगाव आणि जवाहरलाल नेहरु स्टेडिअम-फातोर्दा याठिकाणी प्रमुख क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यात आयोजित करणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा संस्मरणीय ठरतील, असे किरण रिजीजू म्हणाले. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून राज्याला स्पर्धेच्या आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी बैठकीत सांगितले.Conclusion:
Last Updated : Jan 21, 2020, 10:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.