ETV Bharat / city

पेठ तालुक्यात पाण्याच्या एका हंड्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत.. - नाशिक

पेठ तालुक्यातील घुबडसका गावात टँकरद्वारे विहिरीत पाणी टाकले जाते आणि हे पाणी काढण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडते. विहीरीच्या कठड्यावर चढून अक्षरशः हंडाभर पाणी मिळण्यासाठी महिला जीव मुठीत घेवून विहीरीतून पाणी काढत आहेत.

एका हंड्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत..
author img

By

Published : May 21, 2019, 12:10 AM IST

नाशिक - जिल्ह्यात दुष्काळाचे भीषण वास्तव समोर आले आहे. पेठ तालुक्यातील घुबडसका गावात टँकरद्वारे विहिरीत टाकलेले पाणी काढण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत करत आहेत.

एका हंड्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत..

नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी ९ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. १ हजारांच्यावर गावात आणि वाड्या वस्तींवर प्रशासनच्यावतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिकच्या पेठ तालुक्यातील घुबडसका गावात टँकरद्वारे विहिरीत पाणी टाकले जाते आणि हे पाणी काढण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडते. विहीरीच्या कठड्यावर चढून अक्षरशः हंडाभर पाणी मिळण्यासाठी महिला जीव मुठीत घेवून विहीरीतून पाणी काढत आहेत. अशावेळी कुठला अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पेठ तालुक्यासारखी परिस्थिती सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण, सटाणा आणि बागलाण भागात आहे. या भागात देखील टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मनमाड शहरात तर चक्क पाण्याच्या चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. मनमाड मध्ये २५ ते ३० दिवसांनंतर एकदा पाणीपुरवठा केला जातो. पाण्याचे महत्व ओळखून शहरातील नागरिकांनी सुद्धा पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. नाशिक जिल्ह्यात धरणात आज केवळ १३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला जर पाऊस झाला नाही तर यापेक्षाही भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते.

Intro:नाशिकच्या पेठ तालुक्या पाण्याच्या एका हंड्यासाठी महिलांची सुरू आहे जीवघेणी कसरत....

Body:नाशिक मध्ये दुष्काळाचे भीषण वास्तव समोर आलं आहे...पेठ तालुक्यातील घुबडसका गावात टँकर द्वारे विहिरीत टाकलेले पाणी काढण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत सुरू आहे...पाण्यासाठी सुरू असलेला गोंधळ बघून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही....

नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यात पैकी 9 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला,हजार हुन अधिक गाव,वाड्या वस्तीवर प्रशासनच्या वतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो, नाशिकच्या पेठ तालुक्यातील घुबडसका गावात टँकरद्वारे विहिरीत पाणी टाकले जाते, आणि हे पाणी काढण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडते, विहिरीच्या कठड्यावर चढून अक्षरशः हंडाभर पाणी महिलांचा जीवघेणा खेळ सुरू आहे,

अशावेळी कुठला अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित होतो,एकीकडे शहरात पाण्याचा अपव्यय केला जातो म्हणून महानगरपालिकेकडून कारवाई केली जाते,मात्र त्याच जिल्हयात दुसरीकडे हंडाभर पाण्यासाठी महिलांचा हा जीवघेणा खेळ रोज सुरू असून हे वास्तव बघून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही,

पेठ तालुक्यात सारखी परिस्थिती ही सिन्नर ,इगतपुरी ,त्र्यंबकेश्वर कळवण, सटाणा, बागलाण आदी भागाची देखील आहे या भागात देखील टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो, मनमाड शहरात तर चक्क पाण्याची चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. मनमाड मध्ये 25 ते 30 दिवसांनंतर एकदा पाणीपुरवठा केला जातो ,
पाण्याचे महत्व ओळखून शहरातील नागरिकांनी सुद्धा पाणी जपून वापरणे गरजेचं आहे..नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाण्याने तळ गाठला आहे,नाशिक जिल्ह्यात धरणात आज मीतिला केवळ 13 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे, जून महिन्याच्या सुरुवातीला जर पाऊस झाला नाही तर ,यापेक्षाही भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते..

टीप nsk-pani smasya

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.