नाशिक - दिंडोरी तालुक्यातील अधिकाधिक बागायतदार हे आपले द्राक्ष निर्यात करत असतात. परंतू, या वर्षी द्राक्षबाग छाटणी केल्यानंतर आलेल्या धुक्यांमुळे आपले द्राक्ष पीक वाचवण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत आहे. अतोनात प्रयत्न करून आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे पिकाची निगा ठेवणारा शेतकरी, या धुक्यामुळे आता अधिकच चिंतेत आहे.
हेही वाचा... 'अच्छे दिन'बद्दल विचारल्यावर तुमची बोबडी का वळते? ; युती तुटली म्हणजे आम्ही धर्मांतर केले नाही
दिंडोरी तालुक्यातील 70 ते 80 टक्के शेतकरी हे द्राक्ष लागवड करतात. मात्र आता अचानक वाढलेल्या थंडीमुळे व धुक्यामुळे द्राक्षावर डावणी, भूरी रोगाचा प्रार्दूभाव होण्याची भीती द्राक्ष उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहे.
हेही वाचा... 'मोदी सरकार हिंसा आणि विभाजनाची जननी', सोनिया गांधींची टीका
द्राक्ष बागायतदाराला येणारा सर्वसाधारण खर्च
- द्राक्ष गोडा बार छाटणी - ५ हजार रूपये
- फेल काढणे - ३ हजार रूपये
- डिंपींग - ३ हजार रूपये
- थिनिंग - १२ हजार रूपये
- पेपर बंडल - १८ हजार रूपये
- पेपर लावणे - १६ हजार रूपये
- खते / पावडर - २.५ ते ३ लाख रूपये
हेही वाचा... पुण्यातील कोंढव्यात सात मजली इमारतीला भीषण आग
द्राक्षबाग गोडाबार छाटणीपासून ते निर्यातक्षम द्राक्ष तयार करण्यासाठी साधारणतः तीन लाखांच्या वर खर्च येत असल्यामुळे शेतकरी राहुल चौरे यांनी सांगितले आहे. यामुळे वाढत्या धुक्यामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीच्या भीतीने द्राक्षबागायतदार धास्तावले असून सरसकट कर्जमाफीची मागणी शेतकरी करीत आहेत.