नाशिक - रत्नागिरितील चिपळूणमध्ये पूराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून धान्य व राॅकेल पुरवठा तातडीने सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न पुरवरठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
'रस्ताच राहिला नाही, म्हणून मदत पोचण्यात अडथळे'
पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाने मदतकार्य सुरु केले आहे. पुराच्या पाण्यात सर्व बुडाले असल्याने, मदत कार्यात अडथळे आले. आता पूर ओसरल्यानंतर मदतकार्य सुरु झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले असून, त्यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. असेही भुजबळ म्हणाले. पुराच्या पाण्यामुळे इलेक्ट्रिसिटी गेली असल्याने, तातडीने रॉकेल वाटप करण्यात येत आहे. शिवभोजनच्या थाळ्या देखील वाढवून वाटप करण्यात येतील. पुराचे पाणी रस्त्यावर जास्त प्रमाणात असून तिथे मदत पोहोचायला हवी तिथे पोचत नाहीये, एनडीआरएफ काही ठिकाणी पोहोचली आहे. काही ठिकाणी अजून पाऊस पडत आहे. त्यामुळे मदतीला जास्त अडथळे निर्माण होत आहेत अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.
'जर्मनीसारखी ढगफुटी आपल्याकडे होत आहे'
रस्ता नसल्यामुळे अॅम्बुलन्स, ट्रक्स, पोकलँड, जेसीपी यासारखे मशनरी घटनास्थळावर पोचत नाहीत. म्हणून मदत कार्यात मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. तरीही स्थानिक प्रशासन या परिस्थितीवर मार्ग काढत मदत करत आहे. तसेच, केंद्र सरकारकडूनही मदत सुरू झाली आहे. हळूहळू पाणी कमी होईल व मदत लवकरात लवकर पोहोचवली जाईल, असा विश्वासही भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला आहे. ढगफुटीमुळे जर्मनी सारख्या प्रगत देशातही दोनशे नागरिक मृत्यू झाले आहे. तसाच, काहीसा प्रकार आपल्याकडे होत आहे.
'... त्याची काळजी मी घेतो'
राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नवशा गणपती मंदिरात पुजा केली. मात्र, गुन्हे कार्यकर्त्यांवर दाखल झाले आहेत. याच्याबाबत विचारले असता, त्याबाबत छापून आले व सर्वांनी वाचले. यापुढे जिल्ह्यात कोणी येणार नाही, जाणार नाही याची दक्षता मी घेतो, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे.