ETV Bharat / city

Dada Bhuse : आनंद दिघेंच्या विचारांचा पघडा असलेले दादा भुसे शिंदे सरकारमध्ये मंत्री होणार? - नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी शर्यत

महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेने दादा भुसे यांना राज्याचे कृषिमंत्री ( Former Agriculture Minister Dada Bhuse ) पद बहाल केले होते. अशात शिवसेनेच्या इतर आमदारांबरोबर आनंद दिघे समर्थक भुसे यांनी शिंदे गटात सामील होत एकनाथ शिंदे यांच्या सोबतची त्यांनी मैत्री निभावली. आता नव्याने होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ( Maharashtra cabinet expansion ) दादा भुसे यांना कॅबिनेट मंत्रीपद ( Dada Bhuse become cabinet minister ) मिळणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाल्याचे सुत्रांनी सांगितले. यासोबतच भुसे हे नाशिकचे पालकमंत्री ( Nashik Guardian Minister race ) पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे समजते.

Former Agriculture Minister Dada Bhuse
माजी कृषिमंत्री दादा भुसे
author img

By

Published : Aug 8, 2022, 5:22 PM IST

Updated : Aug 9, 2022, 6:52 AM IST

नाशिक : महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेने दादा भुसे यांना राज्याचे कृषिमंत्री ( Former Agriculture Minister Dada Bhuse ) पद बहाल केले होते. अशात शिवसेनेच्या इतर आमदारांबरोबर आनंद दिघे समर्थक भुसे यांनी शिंदे गटात सामील होत एकनाथ शिंदे यांच्या सोबतची त्यांनी मैत्री निभावली. आता नव्याने होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ( Maharashtra cabinet expansion ) दादा भुसे यांना कॅबिनेट मंत्रीपद ( Dada Bhuse become cabinet minister ) मिळणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाल्याचे सुत्रांनी सांगितले. यासोबतच भुसे हे नाशिकचे पालकमंत्री ( Nashik Guardian Minister race ) पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे समजते.

कोण आहे दादा भुसे ?
दादाजी दगडू भुसे यांचा जन्म 6 मार्च 1964 रोजी नाशिक जिल्ह्याच्या मालेगावमध्ये झाला. त्यांनी डीसीए पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांना दोन मुले आहेत. मालेगाव बाह्य हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ असून तेथील ते आमदार आहे.

शिवसैनिक ते मंत्री - सुरुवातीला मालेगाव हा काँग्रेस गड म्हणून ओळखला जायचा. काँग्रेस सोबत समाजवाद्यांचे या भागात वर्चस्व होते. त्यांच्या राजकारणात कोणीही टिकून राहण्याची शक्यता नव्हती. या काळात
सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या दादा भुसे यांनी मालेगावमध्ये शिवसेना रुजवण्यास सुरुवात केली. गावोगावी त्यांनी शिवसेनेच्या शाखा सुरू करत युवकांना एकत्रित केले. अशात साधा शिवसैनिक ते तालुकाप्रमुख अशी मजलही त्यांनी मारली. शिवसेनेचे एकनिष्ठ असल्याने आधी फडणवीस सरकारमध्ये त्यांना ग्रामविकास राज्यमंत्री पद नंतर आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट कृषिमंत्री पद देण्यात आले. घरात दूरवर कुठलाही राजकीय वारसा नसताना त्यांनी आपल्या हिंमतीवर राजकारणात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले.

हिरे घराण्याला आव्हान- मालेगाव या भागात सहकारमहर्षी भाऊसाहेब हिरे यांचे वर्चस्व होते. त्यांच्यानंतर त्यांच्या घरातील वारसांनी ही परंपरा कायम राखली. मालेगावमधील हिरे घराण्याच्या या वर्चस्वला त्यांनी कायम आव्हान दिले. सुरुवातीला भुसे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. नंतर मात्र, त्यांनी या पराभवावर मात केली. 2004 मध्ये प्रस्थापित हिरे घराण्याचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर मात्र भुसे यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. मालेगाव बाह्य मतदारसंघात त्यांनी सलग चारवेळा दणदणीत विजय मिळवला.

समाजकारणी कुटुंब - दादा भुसे हे राजकारणात आहेच. पण त्यांची पत्नी अनिता भुसे या शैक्षणिक, सामाजिक,आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. तर त्यांचे चिरंजीव अजिंक्य आणि अविष्कार हे दोघे ही युवासेनेत सक्रिय आहेत. त्यामुळे राजकारण आणि समाजकारणाला भुसे कुटुंबाकडे पाहिले जाते.

बेधडक नेते दादा भुसे - कृषीमंत्री असताना दादा भुसे हे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथे येत असताना त्यांनी वाहन वाहतूक टाळून मुंबई लोकलने प्रवास केला. त्यांचा हा लोकल प्रवास चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. याच काळात शेतकऱ्यांना खत दिली जात नसल्याने तसेच विक्रेत्यांनी युरियाची साठेबाजी केल्याच्या तक्रारी भुसे यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. तसेच विक्रेत्यांकडून एका खतावर दुसरे खत किंवा बियाणे घेण्याची सक्ती करण्यात येते होती. युरियाची जादा दराने विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारीही त्यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी थेट औरंगाबादमध्ये एका दुकानावर छापा मारला. चेहऱ्यावर उपरणे बांधून मोटरसायकलवर ते दुकानात दाखल झाले आणि त्यांनी युरियाची मागणी केली. मात्र युरिया शिल्लक नाही असे दुकानदारांनी म्हटल्यावर दादा भुसे यांनी कृषी अधिकाऱ्यांना बोलवत दुकानाची झडती घेतली. यात एक हजारहून अधिक युरियाच्या गोण्या आढळून आल्या. यानंतर कृषिमंत्री दादा भुसे यांच्या आदेशानंतर तात्काळ या दुकानावर कारवाई करण्यात आली होती.

हेही वाचा - TET Exam Scam: टीईटी परीक्षा घोटाळ्यातील 780 विद्यार्थ्यांची यादी रद्द, शिक्षण संचालक पुढील कारवाई करणार

Last Updated : Aug 9, 2022, 6:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.