नाशिक - गुढीपाडव्याच्या ( Aniket Deshpande Maharaj on Gudi Padwa ) दिवशी प्रत्येक हिंदू नागरिक आपल्या घराबाहेर गुडी उभारत असतो. याला अध्यात्मिक आणि धार्मिक महत्व आहे. प्रभू रामचंद्र हे वनवास संपवून आयोध्येत आले तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढी पाडवा ( Gudi Padwa 2022 ). उभारण्यात येणारी गुढी सुख, शांती आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते.
हेही वाचा - Nashik CP : नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचा बदलीसाठी अर्ज
गुढी कशी उभारावी? : एक बांबू घ्यावा, बांबू हा आपल्या शरीर रचनेत मणक्याचे प्रतीक, कणखरतेचे प्रतीक मानले आहे. त्याच्यावर हळद, कुंकू, अष्टगंध यांचे सहा टिपके लावावे, त्यानंतर रेशमी भगवे वस्त्र हे बांबूला परिधान करावे. त्याचबरोबर कडू लिंबाचा आणि आंब्याचा पाला आणि सुगंधी पुष्पांचा हार अर्पण करावा. तसेच, गोड पदार्थ म्हणजे साखरेचा हार परिधान करावा. त्याची विधिवत पूजा करावी, त्याला नैवेद्य दाखवावा आणि गुढीला आशीर्वाद मागून गुढीकडे प्रार्थना करावी. गुढी उभारून आनंद उत्सव साजरा करावा, अशी माहिती महंत अनिकेत देशपांडे यांनी दिली.
हेही वाचा - Gudipadwa 2022 : गुढीपाडवा सणानिमित्त पैठणीची गुढी वस्त्र