ETV Bharat / city

Union Minister Narayan Rane on Shivsena : ईडीत फाईल तयार असलेल्या शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांची माझ्याकडे यादी - केंद्रीय मंत्री राणे - संजय राऊत

काळा पैसा कशा पद्धतीने पांढरा करण्यात आला व तो शिवसेनेच्या कोण कोणत्या मोठ्या नेत्यांनी केला याची माझ्याकडे यादी आहे. तसेच ईडीकडे कोणत्या शिवसेनेच्या नेत्यांच्या फाईली तयार आहेत याचीही यादी माझ्याकडे आहे, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane on Shivsena ) म्हणाले. तसेच संजय राऊत ( Sanjay Raut ) हे शिवसेनेसाठी घातक असून वरिष्ठांची खुर्ची कधी रिकामी होते व कधू बसू, यासाठी खटाटोप सुरू असल्याचाही आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

बोलताना केंद्रीय मंत्री राणे
बोलताना केंद्रीय मंत्री राणे
author img

By

Published : Mar 1, 2022, 7:17 PM IST

नाशिक - शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची ईडीमध्ये फाईल तयार असल्याची यादी माझ्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी केंद्रात यादी पाठवली तर मी देखील यादी काढून देणार, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane on Shivsena ) यांनी शिवसेना तसेच खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांना दिला आहे.

बोलताना केंद्रीय मंत्री राणे

केंद्रातील संस्था बाप -गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राणे आणि शिवसेना वादात आता नवा वाद रंगू लागला आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी शिवसेना भवन येथून साडेतीन नेत्यांना लवकरच अटक होईल, असा इशारा देत पत्रकार परिषद घेत अनेक नेत्यांची नावं घेता भाजपवर मोठी टीका केली होती. त्यावेळी केंद्रीय तपास यंत्रणांवरही राऊत यांनी सडकून टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देत नारायण राणे यांनी संजय राऊत व शिवसेनेवर टीका केली. राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून जरी आम्हाला कारवाईला सामोरे जावे लागत असले तरी या छोट्या संस्था आहेत. केंद्रातील संस्था या बाप आहे, असेही राणे म्हणाले.

राज्यासाठी घातक - नाशिकला आयटी पार्क प्रकल्प होणे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या प्रकल्पाची कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर तत्काळ परवानगी देण्यात येणार आहे. पण, त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका बोलवा, असे राज्यातील मंत्र्यांना सांगण्यात आले. पण, ते बैठका बोलवत नाहीत. उलट राज्यातील अधिकाऱ्यांना वेठीस धरून काम केले जात आहे. हे राज्यासाठी घातक असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

दिशावर अत्याचार करणारे मंत्री कोण या बाबामी आम्ही समोर आणू - मागील अडीच वर्षांपासून दिशाही तिच्या आई-वडिलांसोबत राहत नव्हती. ती तिच्या मित्राबरोबर राहत होती आणि त्याच्याशी डिसेंबरमध्ये लग्नही करणार होती, असे असताना तिच्या आईवडिलांनी कोणाच्या सांगण्यावरून तक्रार दिली. कोणत्या महापौर त्यांच्याबरोबर फिरत आहेत. हे आताच स्पष्ट होत आहे. पण, तिच्या आईवडिलांनी चुकीच्या दिशेने न जाता आम्हाला मदत केली तर दिशाने हे पाऊल का उचलले तिच्यावर अत्याचार करणारे मंत्री कोण आहेत या सगळ्या बाबी आम्ही समोर आणू, असे नारायण राणे म्हणाले.

हेही वाचा - Nilesh Rane allegations over Nawab Maliks : नवाब मलिक हेच दाऊदचे फ्रंट मॅन असू शकतात - निलेश राणे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.