नाशिक - जागतिक योगा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री ( Home Minister ) अमित शहा ( Amit Shah ) हे नाशिक ( Nasik ) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्र्यंबकेश्वर ( Trimbakeshwar ) येथील गुरूपीठ परिसरात गृहमंत्री अमित शहा हे योगा दिनानिमित्त ( Yoga day ) आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या निमित्त केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार ( Bharti Pawar ) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या.
21 जूनला योगा दिन - जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने देशातील 75 निवडक ठिकाणी मंत्र्यांच्या उपस्थितीत हा दिन साजरा केला जाणार आहे. त्याअनुषंगाने गृहमंत्री अमित शाह हे 21 जूनला नाशिक जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. त्र्यंबकेश्वर येथील गुरूपीठ परिसरात गृहमंत्री अमित शहा हे योगा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त केंद्रीय राखीव पोलिस दलाकडून सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून याठिकाणी काय उपाययोजना करण्यात येत आहे, याची माहिती डॉ. पवार यांनी घेतली.
थेट प्रक्षेपण - कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठी अखंडित वीजपुरवठा, वेगवान इंटरनेटची सुविधा अबाधित ठेवण्यात यावी, अशा सूचना दिल्या आढावा बैठकीत डॉ. पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या दिवशी सकाळी अमित शहा यांच्यासोबत केवळ 150 लोकांनाच मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार आहे. याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वॉटरप्रुफ पेंडाल बांधण्याची तयारीदेखील सुरू केली आहे. 21 जूनला सकाळी साडेपाचपासून कार्यक्रमांना सुरवात होणार आहे. यामध्ये साडेसहा ते सातपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वांना ऑनलाइन माध्यमातून संबोधित करतील. त्यानंतर पुढील 45 मिनिटे योगाची प्रात्यक्षिके केली जाणार आहे.
हेही वाचा - Farmers prefer cotton crop : पावसाचे आगमन होताच पेरण्याच्या कामाला वेग; कपाशीच्या बियाणांची सर्वाधिक विक्री