नाशिक - नाशिकच्या सटाणा तालुक्यातील साल्हेर किल्ल्यावरुन ( Salher Fort ) 2 पर्यटक पाय घसरुन, दरीत पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका पर्यटकाचा ( Tourists ) मृत्यू झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. भावेश शेखर अहिरे असे मयत तरुणाचे नाव आहे. तर मनिष सुनील मुठेकर असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असुन त्याला उपचारासाठी रुग्णालयात ( hospital ) दाखल करण्यात आले आहे.
साल्हेरवाडीकडून उघड्या दरवाजाकडून किल्ल्याच्या चढाईला- सटाणा तालुक्यातील शिवकालीन साल्हेर किल्ल्यावर फिरायला गेलेल्या 2 तरुणांचा पाय घसरून, दरीत कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. काल दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. मालेगाव येथील 12 तरुणांचा गट किल्ल्यावर फिरायला गेला असता, भावेश शेखर अहिरे ( वय- 21) आणि मनीष सुनील मुठेकर ( वय- 21) या तरुणांचा पाय घसरल्याने दरीत कोसळले. यात भावेशचा जागीच मृत्यू झाला आहे. मनीष जखमी झाला आहे. मृत भावेश हा हौशी येथील नायब तहसीलदारांचा मुलगा आहे. या तरुणांनी साल्हेरवाडीकडून उघड्या दरवाजाकडून किल्ल्याच्या चढाईला सुरुवात केली होती. येथे असलेल्या अवघड 65 पायऱ्या चढताना पाय घसरल्याने हा धक्कादायक अपघात घडला आहे. काहींनी घटनेची माहिती मालेगावला दिली.
मालेगाव येथील तरुणांचा ग्रुप पिकनिकसाठी आला होता- या ग्रुपने अवघड समजल्या जाणाऱ्या साल्हेर वाडीकडून उघड्या दरवाजाकडून किल्ल्याच्या चढाईला सुरुवात केली होती. येथील अतिशय अवघड अशा 65 पायऱ्या आहेत. याच ठिकाणाहून भावेश अहिरे आणि मनिष मुठेकर हे दोन तरुण पाय घसरुन दरीत पडले. यात भावेशचा जागीच मृत्यू झाला तर मनिषला गंभीर दुखापत झाली असून त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाचे मनाई आदेश झुगारुन हे तरुण अशा अवघड ठिकाणी पिकनिकसाठी आले होते.