ETV Bharat / city

नाशिकमध्ये ट्रक-सिटी बसचा अपघात, घटना सीसीटीव्हीत कैद

author img

By

Published : Aug 31, 2019, 11:27 AM IST

Updated : Aug 31, 2019, 12:47 PM IST

नाशिकमधील पंचवटीतील तारवालानगर येथील सिग्नलवर आज सकाळी ट्रक व बसचा अपघात झाला.

ट्रक-सिटी बसचा अपघात

नाशिक - पंचवटीतील तारवाला नगर येथील सिग्नलवर आज सकाळी सव्वा सहाच्या सुमारास ट्रक व बसचा अपघात झाला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या अपघाताची सर्व दृश्ये सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून अपघातात रस्त्यावरुन जाणारा दुचाकीस्वार थोडक्यात बचावला आहे.

नाशिकमधील ट्रक-सिटी बसच्या अपघाताची दृश्ये

सकाळी सहा ते सव्वासहा वाजण्याच्या सुमारास निमाणीहून दिंडोरी रोडमार्गे म्हसरुळकडे एक सिटी बस (एमएच-१५, एके ८०९३) जात होती. मात्र, शरदचंद्रजी मार्केट यार्डकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (एमएच-४५,टी-६६६७) तारवाला नगर सिग्नलवर या बसला धडक दिली. या अपघातात बस व ट्रकचे नुकसान झाले आहे. बसमध्ये प्रवाशी नसल्याने जीवितहानी झालेली नाही.

Intro:नाशिक पंचवटीतील तारवाला नगर येथील सिग्नलवर आज सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान ट्रक व बसच्या अपघात झाला.सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून बस व ट्रक नुकसान झाले आहे या अपघाताचे सर्व दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून या अपघाताच्या दरम्यान रस्त्यावरून जाणारा दुचाकीस्वार थोडक्यात बचावला आहे
Body:याबाबत अधिक माहिती अशी की,आज सकाळी निमाणी हुन दिंडोरी रोडकडून म्हसरूळकडे जाणारी सिटी बस क्रमांक एमएच१५ऐके ८०९३ जात होती.सकाळी सहा ते सव्वा सहा वाजेच्या दरम्यान शरदचंद्रजी मार्कट यार्ड कडून भरघाव वेगाने ट्रक क्रमांक एमएच४५टी६६६७ ने तारवाला नगर सिग्नलवर सिटी बसला धडक दिली.या अपघातात सिटी बस व ट्रकचे नुकसान झाले असून सुदैवाने बस मध्ये प्रवाशी नसल्याने जीवितहानी झालेली नाही.Conclusion:
Last Updated : Aug 31, 2019, 12:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.