ETV Bharat / city

Nashik news : परतीच्या पावसामुळे नुकसान, नाशिकमधील नाफेडच्या गोदामातील हजारो क्विंटल कांदा सडला

महाराष्ट्रात सध्या परतीतच्या पावसाला सुरूवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे ( return raining in nashik ) पिंपळगावच्या नाफेडच्या गोदामातील शेकडो क्विंटल कांदा सडला ( onion rotted in Nafed godown ) असून, यामुळे सरकारचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी चौकशीची मागणी केली आहे.

author img

By

Published : Oct 12, 2022, 6:57 PM IST

onion rotted in Nafed godown in Nashik Due to return rains
नाशिक, पिंपळगावच्या नाफेडच्या गोदामातील शेकडो क्विंटल कांदा सडला आहे.

नाशिक : महाराष्ट्रात सध्या परतीतच्या पावसाला सुरूवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे ( return raining in nashik ) पिंपळगावच्या नाफेडच्या गोदामातील हजारो क्विंटल कांदा सडला ( onion rotted in Nafed godown ) असून, यामुळे सरकारचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. जाता जाता पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान केले असून हाता तोंडाशी आलेली पिके डोळ्यादेखत वाया गेल्याने शेतकरी हताश झाला. नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी चौकशीची मागणी केली आहे.

बाजार हस्तक्षेप योजना - नाशिकमधील नाफेड बाजार समितीत बाजार हस्तक्षेप योजने अंतर्गत 20 हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करून पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीच्या आवारात या कांद्याची साठवण केली होती.मात्र पावसाच्या पाण्याने या कांद्याचे अतोनात नुकसान झाले आहे. संपूर्ण कांदा पाण्यात गेला असून कांद्याला कोंब फुटले आहेत.आणि यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे.

चौकशी मागणी - बाजार समितीत इतक्या मोठ्या प्रमाणत कांदा खरेदी करतांना साठवण क्षमता आणि सुरक्षितता या बाबींना प्राधान्य देण्याची नितांत आवश्यकता असते.मात्र नाफेडने या बाबीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने कोट्यवधी रुपयांचा कांदा खऱ्या अर्थाने पाण्यात गेला असेच म्हणावे लागेल.या घटनेमुळे शासनाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. संपूर्ण कांदा सडल्यामुळे नुकसानाची भरपाई होणे शक्य नाही शकत नाही. या घटनेची चौकशी करणे गरजेचे असून यामागे प्रशासनाची अनास्था दिसून येत आहे.कांद्याची दरवाढ होऊ नये यासाठी नाफेड बाजार हस्तक्षेप योजने अंतर्गत कांदा खरेदी करीत असते,पण चुकीच्या पद्धतीने कांदा साठवण केल्यानं शासनाचे नुकसान झाले आहे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.