ETV Bharat / city

नाशकात चोरी करताना चोराचा बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू - Nashik news update

नाशकात मृतक आपल्या साथीदारांसह स्टार लाईन बिल्डींगमध्ये सळई, गज गेला होता. यावेळी तो इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना रिक्षा न मिळाल्याने साथीदारांनी पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या चोराचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी मृतासह त्याच्या साथीदारांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

thief fell from third floor of building and died while stealing in Nashik
नाशकात चोरी करताना चोराचा बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू
author img

By

Published : Sep 21, 2021, 2:02 AM IST

नाशिक - द्वारका येथील ट्रॅक्टर हाऊसजवळील झाडाझुडपात तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला होता. या मृतदेहासंदर्भात पोलिसांच्या तपासात असे उघडकीस आले की, मृतक आपल्या साथीदारांसह स्टार लाईन बिल्डींगमध्ये सळई, गज गेला होता. यावेळी तो इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना रिक्षा न मिळाल्याने साथीदारांनी पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या चोराचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी मृतासह त्याच्या साथीदारांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरी करताना तिसऱ्या मजल्यावरून पडला चोर -

मुंबई-आग्रा रोडवरील महिंद्रा ट्रॅक्टर हाऊस समोरील सबवेमधील झाडाझुडपांमध्ये एक अनोळखी तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्याने भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक संभाजी निंबाळकर, गुन्हे विभागाचे निरीक्षक दत्ता पवार यांच्यासह त्यांची टीम घटनास्थळी पोहचली. मृतदेहाची ओळख पटवत असतांना मृताचा मित्र शितळादेवी मंदिर परिसरात असल्याची माहिती समजल्यावर पाेलिसांनी त्याचा शोध घेवून विचारपूस केली. त्यावेळी त्याने मृताचे नाव चंदू सामा रहासे उर्फ भोला (३२, मुळ रा. मांडवी खुर्द, नंदुरबार) असे सांगितले. चंदू व त्याचे साथीदार दि. २० सप्टेंबर राेजी पहाटे पाच वाजता ट्रॅक्टर हाऊसजवळील स्टार लाईन बिल्डींगमध्ये सळई, गज चोरी करण्यासाठी गेले हाेते. तेव्हा बिल्डींगच्या तिसऱ्या मजल्यावरून चंदू खाली पडला.

रिक्षा न मिळाल्याने साथीदाराला जखमी अवस्थेत साेडून चोरटे गेले पळून -

या माहितीवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत बिल्डींगची पाहणी केली असता मोकळ्या जागेत जमिनीवर रक्त पडलेले दिसले. प्रथमदर्शनी हा खुनाचा प्रकार वाटत होता, परंतु तपासानंतर हा प्रकार हा अपघाताचा असल्याचे निष्पन्न झाले. मृत रहासे व त्याचे साथीदार चोरी करण्यासाठी गेले. मात्र, चंदू खाली पडला. त्यानंतर त्याचे साथीदार चंदूला औषधोपचारासाठी घेवून जात असतांना अमृतविनायक बिल्डींगच्या समोर रस्त्यावर रिक्षाची वाट पाहत होते. परंतु रिक्षा न मिळाल्याने त्याचे साथीदार त्याला जखमी अवस्थेत तेथेच झाडाझुडपांत साेडून घाबरून पळून गेले. त्यानंतर चंदू मृत पावला. घटनेची माहिती मिळताच गुन्हेशाखेचे पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना दाखल झाले हाेते. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा व मृत चंदू रहासेच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

हेही वाचा - पत्नीला मूल होत नाही म्हणून बुवाबाजी करत कोंबडीचे रक्त पाजले; तिघांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.