ETV Bharat / city

नाशिक-हैदराबाद विमानात बॉम्ब असल्याची अफवा, फोन करणाऱ्या प्रवाशाला ग्रामीण पोलिसांनी केली अटक

नाशिक - हैदराबाद विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरली होती. या बाबत तातडीने चौकशी केली असता विमानात जागा मिळाली नाही म्हणून प्रवाशाने फोन करून बॉम्ब असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिल्याचा प्रकार उघड झाला आहे

author img

By

Published : Mar 28, 2021, 2:42 AM IST

There were rumors that there was a bomb on the Nashik-Hyderabad flight
नाशिक-हैदराबाद विमानात बॉम्ब असल्याची अफवा, फोन करणाऱ्या प्रवाशाला ग्रामीण पोलिसांनी केली अटक

नाशिक - नाशिक वरून हैदराबादला जाणाऱ्या विमानात जागा मिळाली नाही म्हणून प्रवाशाने फोन करून बॉम्ब असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. हा फोन करणाऱ्या प्रवाशाला ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

विमानात जागा मिळाली नाही म्हणून बॉम्बची अफवा -

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शनिवारी रात्री उशिरा ओझर विमानतळावरून हैदराबादलाजाणाऱ्या विमानात तिकीट काढूनही जागा मिळाली नाही म्हणून प्रवासी आणि विमानतळ प्रशासन यांच्यामध्ये वाद झाला म्हणून प्रवाशाने ग्रामीण नियंत्रण कक्षाला विमानामध्ये बॉम्ब असल्याचा फोन केला, त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

प्रवाशाला ग्रामीण पोलिसांनी केले अटक -

घटनेची माहिती मिळताच ओझर विमानतळावर पोलीस अधीक्षक सचिन पाटील अतिरिक्त पोलिस अधीक्षक शर्मिला वलवाडकर, निफाडचे पोलीस अधीक्षक तांबे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी हजर झाले. त्याचबरोबरीने बॉम्ब विरोधी पथक ही या ठिकाणी हजर झाले, त्यानंतर तातडीने चौकशी केली असता विमानात जागा मिळाली नाही म्हणून प्रवासाने नियंत्रण कक्षास फोन करून माहिती दिल्याची घटना समोर आली आहे. याबाबत संबंधित प्रवाशाला ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.