ETV Bharat / city

Students Travel Flood Waters : विद्यार्थांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास, प्रशासनाचे दुर्लक्ष - A student walks through floodwaters

आदिवासीबहुल सुरगाणा तालुक्यातील ( Surgana Taluka ) भेगू सावरपाडा येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. रस्ताच नसल्याने विद्यार्थ्यांना ( students ) चक्क शाळेत जाण्यासाठी ( student walks through floodwaters ) केटीवेअर बंधाऱ्यावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातून ( flood water ) जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

students
students
author img

By

Published : Jul 24, 2022, 6:11 PM IST

Updated : Jul 24, 2022, 8:55 PM IST

नाशिक - नाशिक शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाने ( Heavy rain in district ) हजेरी लावल्याने अनेक नद्यांना पुर आला आहे. तसेच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रभर मुसळधार पावसाने धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणातून आज ११ वाजता ३० हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये ८१ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून दहा धरण ओव्हर फ्लो झाले आहेत. म्हणून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालीयं. त्याच सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा येथील बंधाऱ्यावरून पुराचे पाणी वाहत आहे. त्यातूनच विद्यार्थ्यांना ( student walks through floodwaters ) शाळेत जाण्यासाठी धोकादायक पध्दतीने प्रवास करावा लागतोयं. पुराच्या पाण्यात ( flood water ) वाढ झाल्याने कधी कधी विद्यार्थ्यांच्या कंबर इतके पाणी देखील असते. यामुळे एखादी घटना घडण्याची शक्यता स्थानिक ग्रामस्थांकडून वर्तवली जात आहे.

हेही वाचा -Beer Bar Permit Virawade : अजबच ! बियरबारच्या परवान्यासाठी स्वागत कमान बांधून देण्याची अट; विरवडे ग्रामपंचायतीचा कारभार

प्रशासनाचे दुर्लक्ष - नाशिकच्या आदिवासी बहुल सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा हे गाव या तालुक्याला मुसळधार पावसानं चांगलं जोडपून काढलेला आहे. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या पुराच्या पाण्यातून विद्यार्थी शाळेत ये, जा करत आहेत. केटिवेअर बंधाऱ्यावरुन, विद्यार्थ्यांचा हा प्रवास काळजाचा थरकाप उडवणारा आहे. कळमने, भेगू, सावरपाडा, मदळपाडा, खिरमणी या गावातील दररोज अशाच कसरती करून शाळा गाठावी लागत आहे. मात्र, प्रशासन याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे. अनावधपणे एखादी घटना घडली तर ती थेट जीवावर बेतू शकते. मग या घटनेला जबाबदार कोण असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहे. वाहत्या पाण्यातून पुराच्या पाण्यातून प्रवास करू नका असं सांगितलं जात असलं तरी दैनंदिन गोष्टीसाठी पुराच्या पाण्यातून जाण्याशिवाय पर्यायच नसेल तर या स्थानिकांनी करायचं काय हे देखील शासनाने सांगावं. शासनाने लवकरात लवकर योग्य ती दखल घेऊन या ठिकाणी पूल बांधावा आणि स्थानिकांची रोजची ही जीवघेणी कसरत थबवावी आशी मागणी होत आहे.

हेही वाचा - Kabbadi Player Killed In Dharavi : धारावीत कबड्डीपटूची डोक्यात स्टंप घालून निर्घृण हत्या; तिघांना अटक

Last Updated : Jul 24, 2022, 8:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.