ETV Bharat / city

या सरकारमध्ये काहीतरी गडबड आहे म्हणत राज्यपालांची पुन्हा राजकीय भूमिका

या सरकारमध्ये काही तरी गडबड आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील गुलाबी गाव भिंतघर येथील आदिवासी सांस्कृतिक भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी राज्यपाल बोलत होते.

koshyaris
koshyaris
author img

By

Published : Feb 4, 2021, 3:07 PM IST

नाशिक - आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांना क्रीडा खात्यात नोकरी देण्यास राज्यपालांनी सांगितल्यावर क्रीडा मंत्र्यांनी होकार तर दिला, मात्र नोकरी दिली नाही. या सरकारमध्ये काही तरी गडबड आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील गुलाबी गाव भिंतघर येथील आदिवासी सांस्कृतिक भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी राज्यपाल बोलत होते.

'आदिवासी भागात वाईट स्थिती'

ते पुढे म्हणाले, की मी छत्तीसगड, गुजरात, झारखंडही फिरलो. आमच्या उत्तराखंडमध्ये तर मोठमोठे पर्वत आहेत. इथे केवळ डोंगरे आहेत. तेथेही आपल्यासारखेच आदिवासी राहतात. पण तेथील लोक आम्ही प्रयत्न केल्याने पुढे गेलेत. इथे मुंबईसारख्या शहरापासून शंभर किलोमीटर अंतरावरील पालघर या आदिवासी भागात वाईट स्थिती आहे. अत्यंत विदारक चित्र आहे. हे आदिवासी शाळांमध्ये शिक्षक देऊ शकले नाहीत. कविता राऊतसारख्या आंतरराष्ट्रीय धावपटूला क्रीडा खात्यात नोकरी देण्यास राज्यपालांनी सांगितल्यावर क्रीडामंत्र्यांनी होकार तर दिला, मात्र नोकरी दिली नाही. या सरकारमध्ये काहीतरी गडबड आहे. त्यामुळे माझे कविताला सांगणे आहे, की थोडा धीर धरावा. कारण काही ना काही अडचणी आणण्याचे धंदेच या सरकारमध्ये सुरू आहेत.

'उपक्रमांना प्रोत्साहन देणे आवश्यक'

आर्थिक मदतीऐवजी कायमस्वरूपी उदरनिर्वाहासाठी स्थानिक आदिवासींना रोजगाराच्या संधी देत त्यांच्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. सुरगाण्यात पडणारे पाणी अडविण्यासाठी कोणी देव येऊन सांगणार नाही. तर स्थानिक अधिकारी, लोकप्रतिनिधींनीच त्यात काम करणे आवश्यक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.