ETV Bharat / city

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्नची मागणी, साहित्य संमेलनात मुद्दा गाजणार? - sahitya sammelan

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीचा मुद्दा साहित्य संमेलनात गाजण्याची चिन्हे दिसत आहेत. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्नची मागणी, साहित्य संमेलनात मुद्दा गाजणार?

author img

By

Published : Jan 27, 2021, 1:32 PM IST

Updated : Jan 27, 2021, 1:41 PM IST

नाशिक - नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सावरकरांचा मुद्दा चांगलाच गाजण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. साहित्य संमेलनात सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीचा ठाराव मांडण्याची मागणी सावरकर प्रेमींकडून केली जात आहे. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

संमेलनाच्या प्रवेशद्वाराला सावरकरांचे नाव देण्याची मागणी
सावरकर प्रेमींनी साहित्य संमलेनाचे आयोजक असलेल्या लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले आणि अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांना या मागणीचे निवेदनही दिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाशिकच्या भगूरचे पुत्र असल्याने संमेलनाच्या प्रवेशद्वारास त्यांचे नाव देण्यात यावे, तसेच व्यासपीठावर सावरकरांची भव्य प्रतिमा असावी आणि तिचे पूजन करण्यात यावे असही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्नची मागणी
सावरकर साहित्याचा जागर होणे अपेक्षितस्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रीय साहित्यिक, विचारवंत, कवी, लेखक, भाषाशुद्धीकार, कादंबरीकार, पोवाडे, काव्यसंग्रह, वार्तापत्रे, पुस्तकांचे अनुवाद, इतिहास लेखन अशी अद्वितीय कामगिरी केली आहे. मुंबई येथे झालेल्या ३८ व्या मराठी साहित्य संमेलनात त्यांना अध्यक्षपदाचा मान मिळाला होता. त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीत होणाऱ्या साहित्य संमेलनात सावरकर साहित्याचा जागर होणे अपेक्षित आहे. साहित्य संमेलनाच्या ठिकाणास स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी असे नाव द्यावे, सावरकरांना सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा ठराव संमेलनात करण्यात यावा. सावरकरांच्या साहित्यावर परिसंवाद आयोजित करावा आणि त्यांच्या साहित्य कृतींचा स्टॉल मांडण्यात यावा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

सगळ्यांनी सबुरीने घेतले पाहिजे - भुजबळ
कोणाचे नाव द्यावे, कोणाचे नाही यासाठी साहित्य संमेलनाचे समिती आहे. ते योग्य ते निर्णय घेण्यास सक्षम असून ते निर्णय घेतील असे नाशिकचे पालकमंत्री छगन भूजबळ यांनी म्हटले आहे. मला असे वाटते की, सगळ्यांनी सबुरीने घेतले पाहिजे. साहित्य संमेलन समितीला या सर्व गोष्टींची कल्पना असून ते योग्य ते निर्णय घेतील असे भूजबळ म्हणाले.

Last Updated : Jan 27, 2021, 1:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.