ETV Bharat / city

Ketki Chitale Case : वडिलांनी मरावं असे बोलणे कोणत्या संस्कृतीत बसते ? सुप्रिया सुळेंचा सुचक प्रश्न - केंद्रीय तपास यंत्रणा

कोणाच्या वडिलांनी मरावं अस बोलणं कोणत्या संस्कृतीत बसत? असा प्रश्न उपस्थित करत ही आमची संस्कृती नाही. मला त्याचा अभिमान आहे, या शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केतकी चितळेचं नाव न घेता टोला लगावला.

सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे
author img

By

Published : May 15, 2022, 6:41 PM IST

नाशिक: सोशल मीडियाचा गैर वापर करणं चिंताजनक असून मी नेहमी भान ठेवून वागते. माझ्यावर मराठी मध्यमवर्गीय संस्कृतीचे संस्कार आहेत. राजकरणाच्या ५५ वर्षात हल्ले होऊन देखील, माझ्या वडिलांनी पण कोणाला अस उत्तर दिले नाही. कोणाच्या वडिलांनी मरावे असे बोलणे कोणत्या संस्कृतीत बसते ? असा प्रश्न उपस्थित करत ही आमची संस्कृती नाही. मला त्याचा अभिमान आहे, या शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ( NCP MP Supriya Sule ) यांनी केतकी चितळेंचे नाव न घेता टोला लगावला.

वडिलांनी मरावं अस बोलणं कोणत्या संस्कृतीत बसत?

राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा समर्थन नाही -

हाॅटेल एमराॅल्ड पार्क येथे रविवारी पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी चितळे प्रकरणावर त्यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. काही लोकांनी त्यांच्या वॉल वर काही तरी लिहिलं आहे. कुठल्याच कायद्यात हे बसत नाही. हे खूप दुर्दैवी आहे. न्यायालय त्याच काम करेल. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा समर्थन करत नाही. हा संस्कृतीचा भाग असून देवेंद्रजी, उद्धवजी आणि राज ठाकरे यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवल्याने त्यांनी आभार मानले. अशी वेळ दुसऱ्या कोणावर आली, तर मी देखील तुमच्या सोबत उभी राहील, असे सांगत यासर्व प्रकरणाचा निषेध नोंदवला. राष्ट्रवादी विद्यार्थ्याकडून आलेली पोस्ट चुकीची आहे. तो मुलगा नक्की पक्षात आहे की नाही, याची चौकशी करुन कारवाई केली जाईल. असे सांगत राष्ट्रवादीचे हे कल्चर नाही, या शब्दात पक्षातील काही जणांकडून चितळे प्रकरणावर सुरु असलेल्या टीकेचे समर्थन करणे त्यांनी टाळले.

देशमुखांचा घरी रेडचा विक्रम -

मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्या सभेत केंद्रीय तपास यंत्रणेवर ( Central Investigation Agency ) केलेल्या टीकेवर बोलताना यंत्रणांचा गैर वापर होतो हे वास्तव आहे. अनिल देशमुख यांच्या बाबत तेच झालं. देशमुख यांच्यावर 108 वेळा रेड करण्याचा विक्रम केंद्राने केला आहे. मग 108 वेळेस तुम्ही काय करत होतात? असा सवाल उपस्थित करत यंत्रणांना काहीच मिळालं नाही म्हणून एवढ्या वेळेस रेड करावी लागते, असा निशाणा त्यांनी साधला.

पंतप्रधानांनी महागाईवर बैठक बोलवावी -

ओवेसी यांच्या वादाबद्दल बोलताना, मी या गोष्टींचा इतका विचार करत नाही. मला माझ्या मतदार संघात खूप काम आहे, असं त्या म्हणाल्या. महागाई, सिलेंडर यापेक्षा मला काही महत्वाचं वाटत नाही. पंतप्रधानांना विनंती आहे की, सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना बोलावून महागाईवर काय करू शकतो यावर चर्चा करा, असे आवाहन त्यांनी केलं.

संसार म्हटलं की भांडण आलचं -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांच्या खंजीर खुपसला, या टिकेला उत्तर देताना संसार म्हटलं की भांड्याला भांड लागतच. सगळं थोडेच गुळगुळीत असते. आमचे भांडण देखील घरातच असते. शेवटी आपण ज्याच्याकडून अपेक्षा करतो त्याच्याशीच भांडतो. त्यांनी पवार साहेबांकडे मागीतले पाहिजे, कारण त्यांच्या अपेक्षा पवार साहेबांकडूनच आहे. सगळेजण आमच्या संसाराबद्दल डाउट घेतात, अशी मिश्किल टिपण्णी त्यांनी केली.

हेही वाचा - Sun Transit in Taurus : वृषभ संक्रांति.. पुढील एक महिना कोणत्या राशीसाठी आहे शुभ, कुणासाठी अशुभ? काय आहेत उपाय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.