ETV Bharat / city

बीएचआर घोटाळ्याप्रकरणी सुनिल झंवर याला अटक

पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून चौकशीला सुरुवात केली होती. बीएचआर पतसंस्थेत अवसायक जितेंद्र कंडारे व व्यावसायिक सुनील झंवरने ठेव पावत्यांचे मॅचिंग, संस्थेच्या मालमत्तांची कवडीमोल दरात विक्री व खरेदी असे व्यवहार करून कोट्यवधींचा अपहार केला.

nashik
nashik
author img

By

Published : Aug 10, 2021, 2:09 PM IST

नाशिक - जळगावच्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी-स्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीत गैरव्यवहाराप्रकरणी फरार असलेल्या सुनिल झंवर याला अखेर नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी नाशिकमध्ये मंगळवारी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

काही दिवसांपूर्वीच जितेंद्र कंडारेला अटक
पुणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने नोव्हेंबर महिन्यात पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून चौकशीला सुरुवात केली होती. बीएचआर पतसंस्थेत अवसायक जितेंद्र कंडारे व व्यावसायिक सुनील झंवरने ठेव पावत्यांचे मॅचिंग, संस्थेच्या मालमत्तांची कवडीमोल दरात विक्री व खरेदी असे व्यवहार करून कोट्यवधींचा अपहार केला. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करताना दोघा चार्टर्ड अकाउंटंटसह चौघांना अटक केली. तर गुन्हा दाखल झाल्यापासून अवसायक जितेंद्र कंडारे व सुनिल झंवर पसार हाेते. मात्र, काही दिवसांपूर्वीच कंडारेला अटक करण्यात आली हाेती.

राजकीय दबाव असल्याची चर्चा
सुनील झंवर महिनाभरापासून पोलिसांना सापडत नव्हता. मध्यंतरी तो जळगावात येऊन गेल्याची तसेच अटक न होण्यामागे राजकीय दबाव असल्याची चर्चा रंगली होती. असे असताना आर्थिक गुन्हे शाखेचे पथक गेल्या काही दिवसांपासून पुन्हा जळगावात आले होते. या पथकाने सुनील झंवर याचा मुलगा सूरज याला घरातून अटक केली हाेती.

या पूर्वी १२ संशयितांना अटक
सुनील झंवर हे राज्यातील भाजपाच्या एका बड्या नेत्याचे निकटवर्तीय आहे. त्यामुळे झंवर यांच्या अटकेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. बीएचआर प्रकरणात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या पूर्वी १२ संशयितांना अटक झाली होती. अटक केलेल्या संशयितांमध्ये उद्योजक, व्यापाऱ्यांचा समावेश होता. यातील काही जण हे राजकीय व्यक्तींच्या जवळचे आहेत. जळगाव,औरंगाबाद, धुळे, अकोला, मुंबई, पुणे या ठिकाणी हे छापे टाकत कारवाई केली होती.नाशिकच्या पंचवटी परिसरातून झंवर याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - कोरोना रुग्ण बरा होऊन महिना उलटल्यावर डेल्टा व्हेरियंटचा अहवाल आला पॉझिटिव्ह, रुग्ण मात्र ठणठणीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.