ETV Bharat / city

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीनिमित्त मनमाडमध्ये राज्यस्तरीय साहित्य संमेलन - मनमाड नाशिक news

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त लाल सेनेच्या वतीने मनमाड येथे राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे नियोजित अध्यक्ष पत्रकार सुधीर ढवळे हे सध्या तुरुंगात आहे.

State level literary gathering in Manmad
मनमाडमध्ये राज्यस्तरीय साहित्य संमेलन
author img

By

Published : Dec 23, 2019, 10:10 AM IST

नाशिक - लाल सेनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने मनमाड येथे 16 वे राज्यस्तरीय साहित्य संमेलन भरवण्यात आले. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य डोक्यावर घेत भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करत येवला रोडवरील हॉलमध्ये या संमेलमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी राज्यभरातील हजारो साहित्यिक व विद्रोही कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी निमित्त मनमाडमध्ये राज्यस्तरीय साहित्य संमेलन

हेही वाचा... 'सीएए व एनआरसीवरुन शहरी नक्षलवादी पसरवत आहेत अफवा'

मनमाडमध्ये होत असलेल्या या साहित्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष पत्रकार सुधीर ढवळे हे सध्या तुरुंगात आहेत. तरीही लाल सेनेने त्यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्याचे मोठे धाडस केले आहे. तसेच शनिवारी शरद पवार यांनी भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशीची मागणी केली. केवळ पुस्तक सापडले म्हणून गुन्हा दाखल होत असेल, तर तशी पुस्तके माझ्याकडेही आहेत. पवारांच्या या भूमिकेचे कबीर कला मंचच्या वतीने स्वागत करण्यात आले असल्याचे अध्यक्ष सागर गोरखे यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा... पीएमसी बँक घोटाळा : अध्यक्ष वरियंम सिंग यांच्या घराबाहेर आंदोलन

पत्रकार सुधीर ढवळे यांच्यावर एल्गार परिषदेत भाषण करून भीमा कोरेगाव येथे दंगली घडविल्या असल्याचा खोटा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मनमाडमध्ये आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाला चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कबीर कला मंच व समता कला मंचने यावेळी शाहिरी जलसा करत संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी सुकुमार कांबळे, लाल सेनेचे प्रमुख कॉम्रेड गणपत भिसे यांच्यासह अनेक विद्रोही साहित्यिक उपस्थित होते.

हेही वाचा... 'गोळ्या झेलू, ...या मातीसाठी रक्ताची होळी कधी बी खेळू'

संघाच्या ध्येयधोरणानुसार भाजप सध्या भूमिका मांडत आहे. जे कोणी वंचीत दलित अल्पसंख्याक कष्टकरी यांच्या बाजूने उभे राहत आहे, त्या सगळ्यांचा आवाज दडपण्याचे षडयंत्र भाजप सरकार करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मागील वर्षी भीमा कोरेगाव येथे दंगा झाला. खरे तर तो दंगा संभाजी भिडे आणि एकबोटेंनी घडवून आणला होता, असा आरोप सागर गोरखे यांनी केला. तरीही भिडे आणि एकबोटे मात्र मोकाट आहेत. तर याऊलट एल्गार परिषदेत ज्यांनी भाषणे केली, त्यांच्यावर खोटा खटला दाखल करून त्यांना जेलमध्ये डांबण्यात आले असल्याचे अध्यक्ष सागर गोरखे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... 'शेतकऱ्यांप्रमाणे मागासवर्गीय महामंडळांचीही कर्ज माफ करा'

यावेळी समता कला मंचच्या समिक्षा मौर्य यांनी देखील सरकारवर टीका करत, एनआरसी हा कायदा असंवैधानिक असूनही तो अंमलात आणला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आणि याचा विरोध करण्यासाठी आम्ही जनतेचा बुलंद आवाज उठवणार असल्याचे सांगितले.

Intro:मनमाड:लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने लाल सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला आज मनमाड मध्ये सुरुवात झाली या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे नियोजित अध्यक्ष पत्रकार सुधीर ढवळे हे तुरुंगात आहे त्यांच्यावर एल्गार परिषदेत भाषण करून भिमा कोरेगाव येथे दंगली घडविला असल्याचा खोटा आरोप करण्यात आला आहे.त्यामुळे आजचे आयोजित असलेल्या या साहित्य संमेलनाला चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.कबीर कला मंच व समता कला मंचने शाहिरी जलसा करत या संमेलनाचे उदघाटन केले.यावेळी सुकुमार कांबळे,लाल सेनेचे प्रमुख कॉम्रेड गणपत भिसे यांच्यासह अनेक विद्रोही साहित्यिक उपस्थित होते.Body:संघाच्या धेयधोरणानुसार भाजाप सध्या भूमिका मांडत असून जे कोणी वंचीत दलित अल्पसंख्याक कष्टकरी यांच्या बाजूने उभे राहिल या सगळ्यांचा आवाज दडपण्याच षड्यंत्र भाजपा सरकार करत असुन त्याचाच एक भाग म्हणून मागील वर्षी भीमा कोरेगाव येथील जो दंगा भिडे आणि एकबोटेनी घडून आणला ते मोकाट असुन एल्गार परिषदेत ज्यांनी भाषण केली त्यांच्यावर खोटा खटला दाखल करून त्यांना जेलमध्ये डांबण्यात आले आहे .आजच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित 16 व्या राज्यस्तरीय साहित्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष पत्रकार सुधीर ढवळे हे देखील जेलमध्ये असून लाल सेनेने त्यांना या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करून मोठे धाडस केले आहे.तसेच काल शरद पवार यांनी भिमा कोरेगाव प्रकरणाची चौकशीची मागणी मान्य केली असून केवळ पुस्तक सापडले म्हणून गुन्हा दाखल होत असेल तर पुस्तक माझ्याकडे पण आहेत अशी भूमिका मांडली त्याचे स्वागत कबीर कला मंचच्या वतीने करत असल्याचे अध्यक्ष सागर गोरखे यांनी स्पष्ट केले.यावेळी समता कलामंचच्या समिक्षा मौर्य यांनी देखील सरकार वर टीका करत nrc हा असंवैधानिक कायदा अंमलात आणला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि याचा विरोध करण्यासाठी आम्ही जनतेचा बुलंद आवाज उठवणार असल्याचे सांगितले आणि हे साहित्य संमेलन त्याचाच एक भाग असल्याचे स्पष्ट केले.Conclusion:लाल सेनेचे जितेंद्र गायकवाड व संदीप कांबळे यांच्या वतीने आजचे 16 वे साहित्य संमेलन भरविण्यात आले होते.प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य डोक्यावर ठेऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करत येवला रोडवरील हॉल मध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला होता.यावेळी राज्यभरातील साहित्यिक व विद्रोही कार्यकर्ते उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.