ETV Bharat / city

Currency Note Press : नाशिक आणि देवासमधील करन्सी प्रेसमध्ये बसवल्या नवीन बँक नोट प्रिंटिंग लाइन्स - Nashik Currency Note Press

महाराष्ट्रातील नाशिक आणि मध्य प्रदेशच्या देवासमध्ये नवीन बँक नोट प्रिंटिंग लाइन्स ( Bank Note Printing Lines ) बसवण्यात आले आहेत. नाशिकमधील चलनी नोटा छापण्याच्या जेलरोड येथील करन्सी प्रेसमध्ये बसवण्यात आलेल्या नवीन बँक नोट प्रिंटिंग लाइनचे गुरुवारी उद्घाटन झाले.

करन्सी प्रेस
Currency Note Press
author img

By

Published : Jan 28, 2022, 7:18 PM IST

नाशिक - सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL) महाराष्ट्रातील नाशिक आणि मध्य प्रदेशच्या देवासमध्ये नवीन बँक नोट प्रिंटिंग लाइन्स बसवण्यात ( Bank Note Printing Lines ) आले आहेत. नाशिकमधील चलनी नोटा छापण्याच्या जेलरोड येथील करन्सी प्रेसमध्ये बसवण्यात आलेल्या नवीन बँक नोट प्रिंटिंग लाइनचे गुरुवारी उद्घाटन झाले.

  • Security Printing and Minting Corporation of India Limited (SPMCIL) sets up new bank note printing lines each at Currency Note Press, Nashik, Maharashtra and Bank Note Press, Dewas, Madhya Pradesh pic.twitter.com/rslBZQEXxi

    — ANI (@ANI) January 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही एक अनुसूचित -‘अ’ मिनीरत्न श्रेणी-I केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आहे, जो संपूर्णपणे भारत सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या (DEA), वित्त मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. 10 फेब्रुवारी 2006 सेक्युरीटी प्रिंटिंग-मिटींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड स्थापन करण्यात आली होती.

नाशिक करन्सी नोट प्रेसचा इतिहास -

नाशिकमध्ये सिक्युरिटी नोट प्रेसची स्थापना 1924 मध्ये ब्रिटिशांनी केली होती. 1928 मध्ये पहिल्यांदा 5 रुपयांची नोट या नोट प्रेसमध्ये छापण्यात आली. 1980 पर्यंत सिक्युरिटी प्रेसमध्येच नोटा छापल्या जात होत्या. 1980 नंतर करन्सी नोट प्रेसमध्ये नोटा छपाईला सुरुवात झाली. करन्सी नोटप्रेसमध्ये 5, 10, 20, 50, 100, 200, 500 रुपयांच्या नोटा छापल्या जातात. वर्षाला सरासरी 4 हजार दशलक्ष नोटा छापल्या जातात.

हेही वाचा - Bharat Biotech Nasal Booster Dose : भारत बायोटेकच्या इंट्रानेसल बूस्टर डोसच्या ट्रायलला DGCI ची परवानगी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.