नाशिक नाशिकच्या रविवार कारंजा Sunday Karanja Mandal येथील चांदीच्या गणपतीला silver Ganapati ब्रिटिश कालीन इतिहास British history and Culture of Lord Ganesh 2022 आहे. रविवार कारंजा बाजारपेठे भागात 90 वर्षांपासून गणपती मंदिर Ganpati Temple for 90 years आहे. 1978 मध्ये या मंदिरात चांदीची मूर्ती बसवण्यात आली. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले, त्यात रविवार कारंजा मंडळाचा सक्रीय सहभाग होता.
नाशिकची धार्मिक आणि अध्यात्मिक शहर म्हणून ओळख आहे. नाशिक शहरात 2 हजाराहून अधिक लहान मोठे मंदिर असून, यात अनेक मंदिरे ही पुरातन आहे. तसेच नाशिक शहरात सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यातीलच एक मंडळ म्हणजे रविवार कारंजा मित्र मंडळ, हे मंडळ ब्रिटिशकालीन असून या भागात 90 वर्षांपासून गणपती मंदिर आहे. पण 1978 साली या मंदिरात चांदीची मूर्ती बसविण्यात आली. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिले. त्यात रविवार कारंजा मित्रमंडळानेही सक्रीय भाग घेतला होता.
1978 साली चांदीच्या मुर्तीची स्थापना रविवारकारांच्या मित्रमंडळाने 1978 साली मंदिरात चांदीची गणेश मूर्ती बसविण्याचा निर्णय घेतला. तेव्हा रविवार कारंजा बाजारपेठेतील व्यावसायिक आणि भाविक यांनी एकत्र येऊन चांदीचा गणपती बनविण्याची संकल्पना उचलून धरली.आणि सर्वांच्या हातभारातून चांदीची मूर्ती प्रत्यक्षात साकारली. आणि त्यानंतर रविवार कारंजा मित्रमंडळाचा चांदीच्या गणपती नाशिककरांचे आकर्षण ठरू लागला. गणेशभक्तांच्या दृष्टीने या मूर्तीला महत्त्व प्राप्त झाले, हा गणपती नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
सामाजिक उपक्रम रविवार कारंजा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव काळात गणपती मंदिरासमोर भव्य देखावा साकारण्यात येतो. हा देखावा बघण्यासाठी जिल्हाभरातून भाविक या ठिकाणी येत असतात. तसेच मंडळाच्या वतीने वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम राबवले जातात. त्यासोबतच सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप, गरिबांना अन्नदान, रक्तदान, तसेच कोरोना काळात नागरीकांची मोफत अँटीजंट टेस्ट करण्यात आली,असल्याचे रविवार कारंजा मित्र मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
आमच्यासाठी श्रध्दा स्थान रविवार कारंजा येथील गणपती मंदिर हे आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे. या बाप्पा कडे जी मनोकामना केली ती पूर्ण होते, अशी आमची आणि भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या रविवार कारंजा भागात आल्यानंतर आम्ही प्रथम बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतो, मग कामाला सुरुवात करतो असे भाविक सांगतात.
हेही वाचा Pushya Nakshatra 2022 पुष्य नक्षत्रात महिलांनी गाईच्या वासराची पूजा केल्यास ते फलदायी ठरते