नाशिक - अक्कड, बक्कड बंबे 80, 90 पुरे 100 असं म्हणत पेट्रोल दरवाढीविरोधात शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधत नाशकात बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला असून हेच का अच्छे दिन? असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे..
हेही वाचा - आमदाराच्या फार्म हाऊसमध्ये घुसले चार ‘अजगर'
अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेल दरवाढीवर निर्णय होऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना पेट्रोल, डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. नाशिकमध्ये पेट्रोल 93 रुपये 57 पैसे तर डिझेलची 82 रुपये 77 पैस लिटर दराने विक्री होत असून यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. हाच विषय घेऊन आता शिवसेनेने रस्त्यावर उतरण्याची तयारी केली असून नाशिकमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात मार्मिक बॅनर लावण्यात आले आहे. नाशिकच्या मध्यवर्ती शिवसेना कार्यालयाबाहेर असा एक बॅनर लावण्यात आला आहे. अक्कड, बक्कड बंबे बो 80, 90 पुरे 100 असं म्हणत पेट्रोल दरवाढी विरोधात शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधत हेच का अच्छे दिन असा प्रश्न उपस्थित केला आहे.
हेही वाचा - फेरीवाल्यांकडून जमा केली जातेय खंडणी, मनसेचा सेनेवर गंभीर आरोप
कोरोना काळात अनेकांचे रोजगार हिरावून, उद्योग देखील अद्याप पूर्वपदावर आले नसल्याने अशा परिस्थितीत घर कसे चालवावे. या नागरीकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अशात दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
2018 मध्ये पेट्रोल गेले होते 92 रुपयांवर
सप्टेंबर 2018 मध्ये नाशिक मध्ये पेट्रोलचे भाव 92 रुपयांवर पोहचल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती.या नंतर केंद्र सरकारने तातडीनं पावलं उचलत तात्काळ 2 रुपये 50 पैसे प्रति लिटर कर मागे घेत नागरीकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता.महाराष्ट्रातील तत्कालीन सरकारने देखील प्रति लिटर 2 रुपये 50 पैस कर कमी केला होता त्यामुळे पाच रुपयांनी पेट्रोल स्वस्त झाले होते.आणि ह्यातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यात आला होता.आता ही सरकारने काही प्रमाणात पेट्रोल वरील कर कमी करून नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
हेच का अच्छे दिन
कोरोना काळात करण्यात आलेल्या लॉक डाऊन नंतर नागरिकांच्या आर्थिक परिस्थिती वर मोठा परिमाण झाला आहे.केंद्र सरकारने नागरीकांना दिलासा दिला पाहिजे ते सोडून म रोज पेट्रोलचे भाव वाढत आहे. काँग्रेसच्या काळात पेट्रोल 60 रुपये झाले होते तेव्हा माजी मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसला बांगड्या पाठवल्या होत्या.