ETV Bharat / city

नाशिक पोलीस प्रशासनावर शिवसेनेचा दबाव - आमदार देवयानी फरांदे - आमदार देवयानी फरांदे

दगडफेक करणाऱ्या व्यक्तीवर अद्याप पोलिसांनी कोणतीच कारवाई केली असून हे आरोपी 48 तास उलटून देखील फरार आहे. पोलीस प्रशासनावर शिवसेनेचा दबाव असल्याचे, भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी म्हटले आहे.

आमदार देवयानी फरांदे
आमदार देवयानी फरांदे
author img

By

Published : Aug 27, 2021, 1:19 AM IST

नाशिक - नारायण राणे प्रकरणावरून शिवसेना कार्यकर्त्यांनी नाशिकच्या भाजपा कार्यलयावर दगडफेक केली होती. मात्र 48 तास उलटून देखील पोलिसांनी संशयित आरोपींना अद्याप अटक केली नाही, अशात पोलीस प्रशासनावर सत्ताधारी शिवसेनेचा दबाव असल्याचा आरोप भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे. तसेच आरोपींना लवकर अटक केली नाही, तर आंदोलन करण्याचा इशार देखील फरांदे यांनी दिला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र भर उमटले. अनेक ठिकाणी भाजपा-सेना कार्यकर्ते समोरासमोर आलेत. नाशिकमध्ये शिवसेनेच्या काही पदाधिकारी कार्यकर्तेनी भाजपाच्या मुख्य कार्यालयावर दगडफेक करत नारायण राणेंबद्दल राग व्यक्त केला. मात्र दगडफेक करणाऱ्या व्यक्तीवर अद्याप पोलिसांनी कोणतीच कारवाई केली असून हे आरोपी 48 तास उलटून देखील फरार आहे. पोलीस प्रशासनावर शिवसेनेचा दबाव असल्याचे, भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी म्हटले आहे.

'ही बाब एका मुख्यमंत्रींना शोभणारी नाही'

नारायण राणे प्रकरणावरून शिवसेना नेते वरून सरदेसाई यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबई येथील घराबाहेर गोंधळ घातला होता. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरदेसाई यांचे कौतुक केले होते. ही बाब एका मुख्यमंत्रींना शोभणारी नाही, असे आमदार फरांदे यांनी म्हटले आहे. तसेच सामना वृत्तपत्रामधून नारायण राणे यांच्याबद्दल आर्वच्च भाषेत विधान केल्याबद्दल संपादक रश्मी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. तसेच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असेही आमदार देवयानी फरांदे यांनी म्हटले आहे. याबाबत पोलीस आयुक्त दीपक पांडये यांना निवेदन देण्यात आले आहे.

हेही वाचा - अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करा-अतुल भातखळकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.