नाशिक - राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या स्नुषा आणि समीर भुजबळ यांच्या पत्नी डॉ. शेफाली भुजबळ यांनी वीरमरण पत्करलेल्या जवानाच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथील वीरमरण प्राप्त जवान केशव गोसावी याच्या कुटुंबासोबत शेफाली यांनी दिवाळी साजरी केली.
हेही वाचा... नाशिकच्या प्रश्नांसाठी सर्वांना सोबत घेऊन विधानसभेत आवाज उठवू - छगन भुजबळ
शेफाली भुजबळांची शहीद जवानाच्या कुटुंबासोबत दिवाळी..
एकीकडे शहरात दिवाळीची धामधूम सुरू आहे. दुसरीकडे सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथील गोसावी यांच्या कुटुंबायांच्या घरी मात्र वेगळेच वातावरण पहायला मिळाले. डॉ. शेफाली भुजबळ यांनी दिपावलीच्या निमित्ताने या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच दिवाळी फराळ व कपड्यांची भेट गोसावी कुटुंबीयांना दिली. यावेळी गोसावी कुटुंबाच्या सदस्यांसोबत दीपावली साजरी करत संपूर्ण भुजबळ कुटुंबीय आपल्या सोबत असल्याचा विश्वास डॉ. शेफाली भुजबळ यांनी व्यक्त केला. यावेळी वीरमरण पत्करलेले जवान केशव गोसावी यांचे वडील सोमगिर गोसावी, पत्नी यशोदा गोसावी, मुलगी काव्या गोसावी यांसह गोसावी कुटुंबातील इतर नातेवाईक उपस्थित होते.
हेही वाचा... दिंडोरीमधून राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ विजयी, विजयानंतर रात्रभर कार्यकर्त्यांचा जल्लोष