ETV Bharat / city

भुजबळांवर बोलण्याइतपत देवेंद्र फडणवीस यांचे वय नाही - शरद पवार

author img

By

Published : Apr 24, 2019, 11:52 PM IST

मुख्यमंत्र्यांनी भुजबळविषयी टिपणी करण्याअगोदर स्वतःच्या पक्षाचे अध्यक्ष कुठल्या आरोपाखाली जेलमध्ये होते आणि नंतर कसे जामिनावर सुटले याचा अभ्यास करावा असा सल्ला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केला.

शरद पवार

नाशिक - आम्ही व्यक्तीद्वेषाचे राजकारण करणारे नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी भुजबळविषयी टिपणी करण्याअगोदर स्वतःच्या पक्षाचे अध्यक्ष कुठल्या आरोपाखाली जेलमध्ये होते आणि नंतर कसे जामिनावर सुटले याचा अभ्यास करावा. भुजबळांवर बोलण्या इतकं देवेंद्र फडणवीसांचं वय नाही. त्यामुळे भुजबळांविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विचार करायला हवा होता, अशी सडकून टीका शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

काँग्रेस-राष्ट्रवादी मित्रपक्षाच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ व धनराज महाले यांच्या प्रचारार्थ गिरणारे येथे आयोजित सभेत पवार बोलत होते.

यावेळी पवार म्हणाले, की मनमोहन सिंग सरकारच्या काळात जी विमाने 450 कोटी रुपयांना खरेदी करण्यात येणार होती, ती आता 1650 कोटी रुपयांना घेतली जात आहेत. ज्या अंबानींनी कधी कागदाचे विमान बनविले नाही, त्यांना विमान बनवण्याचे कंत्राट देण्यात आले. काँग्रेसच्या काळात नाशिकच्या एचएलला विमान बनविण्याचे धोरण आखले, मात्र आता भाजप नेते खासगी कंपनीला देण्याचा घाट घातला जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. देशातील ज्या संस्था जतन करण्याची गरज आहे, त्या संस्था मोडीत काढण्याचा प्रकार केला जात आहे. त्यामुळे या हुकूमशाही सरकारला सत्तेतून घालवण्यासाठी नाशिकमधून समीर भुजबळ आणि दिंडोरीतून धनराज महाले या दोन तरुण उमेदवारांना दिल्लीत पाठवा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले, की पिंपळगाव येथील सभेत मोदींनी नाशिकमध्ये ज्या सप्तरंगाची उधळण केली, त्यांच्या विकासासाठी मोदींनी एक दमडीही दिली नाही. तर छगन भुजबळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विकास कामे केल्याचे ते म्हणाले. मोदी साहब आपने तो कुछ नही दिया अशा आपल्या खास शैलीत त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की शिवसेनेकडून समीर भुजबळ यांच्या विरोधात खोटी माहिती पसरवली जात आहे. आमच्यावर आरोप झाले असले, तरी ते बिनबुडाचे असून त्यातून आम्ही निर्दोष सुटू. मात्र, ज्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना बाँबस्फोटाच्या आरोपाखाली तर अमित शाह यांना खुनाच्या आरोपाखाली अटक झाली, त्यांना उमेदवारी कशी दिली याचाही खुलासा करावा, असे आवाहन त्यांनी भाजपला केले.

Intro:आम्ही व्यक्तीद्वेषाचे राजकारण करणारे नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भुजबळविषयी केलेली टिपणी करण्याअगोदर स्वतःच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष कुठल्या आरोपाखाली जेलमध्ये होते आणि नंतर कसे जामिनावर सुटले याचा अभ्यास करावा देवेंद्र फडणीस मोठे भुजबळांविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विचार करायला हवा होता अशी सडकून टीका खा. शरदचंद्र पवार यांनी मुख्यमंत्र्यांन वर केली..

Body:काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षाच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ व धनराज महाले यांच्या प्रचारार्थ गिरणारे येथे आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी पवार म्हणाले की मनमोहन सिंग सरकारच्या काळात जी विमाने 450 कोटी रुपयांना खरेदी करण्यात येणार होती ती आता सोळाशे पन्नास कोटी रुपयांना घेतली जात आहे आणि ज्या अंबानींनी कधी कागदाचे विमान बनविले नाही त्यांना विमान बनवण्याचे कंट्राकं देण्यात आलं काँग्रेसच्या काळात नाशिकच्या एचएलला विमान बनविण्याचे धोरण आखले मात्र आता भाजप नेते खाजगी कंपनीला देण्याचा घाट घातला जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली देशातील ज्या संस्था जतन करण्याची गरज आहे त्या संस्था मोडीत काढण्याचा प्रकार केला जात असून त्यामुळे या हुकूमशाही सरकारला सत्तेतून घालवण्यासाठी नाशिकमधून समीर भुजबळ आणि दिंडोरी धनराज महाले या दोन तरुण उमेदवारांना दिल्लीत पाठवा असे आवाहन त्यांनी जनतेला केले

Conclusion:यावेळी छगन भुजबळ म्हणाले की पिंपळगाव येथील सभेत मोदींनी नाशिक मध्ये ज्या सप्तरंगाची उधळण केली त्यांच्या विकासासाठी मोदींनी एक दमडीही दिली नाही तर छगन भुजबळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विकास कामे केली असल्याची टीका करत मोदी साहेब आपले तो कुछ नही दिया अशा आपल्या खास शैलीत समाचार घेत ते म्हणाले की शिवसेनेकडून समीर भुजबळ यांच्या विरोधात खोटी माहिती पसरवली जात आहे आमच्यावर आरोप झाले असले तरी ते बिनबुडाचे असून त्यातून आम्ही निर्दोष सुटू मात्र ज्या स्वाध्वी प्रज्ञा सिंग यांना बाँबस्फोटच्या आरोपाखाली तर अमित शहा यांना खुनाच्या आरोपाखाली अटक झाली त्यांना उमेदवारी कशी दिली याचाही खुलासा करावा असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.