नाशिक - आयोध्येमध्ये आज राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्येसुद्धा ह्याचा उत्साह पाहायला मिळाला. नाशिकच्या प्रसिद्ध रामकुंडावरील गोदावरी तीरावर भाजप-सेनेकडून आरती करत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पेढ्यांचे वाटप केले.
नाशिक ही प्रभू रामांची कर्मभूमी आहे. आज अयोध्येत राम मंदिर निर्माण कार्याला सुरुवात झाली. त्याच पार्श्वभूमीवर रामकुंड येथे आयोध्येतील साधू महंतांनी आणलेल्या रामांच्या पादुकांचे पूजन करून, गोदीवरी नदीची आरती तसेच रामरक्षा स्तोत्रं आणि हनुमान स्रोतचं पाठण करण्यात आले. तसेच प्रसिद्ध काळाराम मंदिरात भव्य रांगोळी काढून दीपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच दिवसभर ह्या मोजक्या पूजारीच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
पोलिसांकडून साधुमहंतांना नोटीस-
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रामकुंड परिसरात तसेच एकत्रित येत मोठा उत्सव साजरा करू नये, गर्दी करू नये, यासाठी पोलिसांनी शहरातील साधू महंतांना नोटीस देण्यात आल्या. मात्र, तरी सुद्धा रामकुंड परिसरात आरती करत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी रामकुंड परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.