ETV Bharat / city

Raut Slammed on Government : शिंदे फडणवीस सरकार संपूर्णत: बेकायदेशीर - संजय राऊत - Sanjay Raut Slammed BJP

खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut slammed Goverment ) म्हणाले, की सगळ्या आमदारांचे मुले हे युवासेनेचे पदाधिकारी होते. त्यांच्याकडे निर्णयक्षमता आहे. विधानसभेचे अध्यक्ष हेदेखील शिवसेनेचे आहेत. भाजपला आमच्याविरोधात लढण्यासाठी शिवसेनेचे नेते हवे आहेत.

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Jul 8, 2022, 12:29 PM IST

Updated : Jul 9, 2022, 6:59 PM IST

नाशिक : शिंदे फडणवीस सरकार संपूर्णत: बेकायदेशीर आहे. आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी तारीख दिलेली नव्हती. हे सरकार झुंडशाहीमधून स्थापन झालेले आहे. राज्यपाल हे स्वतंत्र आणि घटनेचे पालन करणारे नाहीत, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut React on Devendra Fadnavis Gov ) यांनी केली. ते माध्यमांशी बोलत होते.

आमची भूमिका सावधगिरीची : खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut Slammed BJP ) म्हणाले, की सगळ्या आमदारांची मुले ही युवासेनेचे पदाधिकारी होते. त्यांच्याकडे निर्णयक्षमता आहे. विधानसभेचे अध्यक्ष हेदेखील शिवसेनेचे आहेत. भाजपला आमच्याविरोधात लढण्यासाठी शिवसेनेचे नेते हवे आहेत. आमच्याच लोकांचा रक्तपात होणार आहे. त्यामुळे आमची सावधगिरीची भूमिका आहे.

राज्यपाल घटनेचे पालन करणारे नाहीत : नाशिक दौऱ्यावर असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, राज्यपालांवर सडकून टीका केली. तसेच, राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला. विधान परिषदेची निवडणूक घ्यावी त्यासाठी आम्हाला तारीख द्यावी, असे अनेकदा आम्ही सांगत होतो. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, हे सरकार येताच 24 तासांत त्यांनी तारीख दिली. त्यामुळे राज्यपाल हे स्वतंत्र वृत्तीचे आणि घटनेचे पालन करणारे नाहीत. हे सर्वांचे मतं आहे, असेही खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

हे सरकारच पूर्ण बेकायदेशीर : हे सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आमदारांच्या अपात्रतेची याचिका न्यायालयात प्रलंबित असताना बहुमताचा ठराव राज्यपाल कोश्यारी यांनी घ्यायला लावणे हे बेकायदेशीर आहे. तसेच आम्ही विधिमंडळ गट नेता यावर नोंदवलेला आक्षेप हे सर्व न्यायालयात प्रलंबित असताना बहुमताचा ठराव घेणे हे लोकशाहीचा खून आहे. असेही संजय राऊत म्हणाले.

भाजपला 40 भोंगे मिळाले : भाजपने माझ्यावर बोलण्याचे थांबवलं आहे. कारण त्यांना नवीन 40 भोंगे मिळाले आहेत. धनुष्य हा शिवसेनेकडेच राहणार, असेही राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदार आता भाजपला जाऊन मिळाल्याने आता ते संजय राऊत यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. त्यावर संजय राऊतसुद्धा तिखट प्रतिक्रिया देताना दिसून येतात. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितले की, माझ्याविरुद्ध बोलायला शिवसेनेचे बंडखोर आमदार भाजपकडे आहेत. त्यांना आता बोलायची गरज नाही.

नाशिक मनपावर सेनेची सत्ता येईल : आज काही नेते खासगी कार्यक्रमामुळे नसतील तरी उद्या होणाऱ्या मेळाव्याला सर्व नेते हजर राहतील. शिवसेना पक्ष चिन्ह आमच्याकडे राहील त्यात काही शंका नाही. ग्रामीण भागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये काही बदल होतील याबाबत लवकरच कळवले जाईल. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेची सेनेची सत्ता येईल, असे ही खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Shinde group spokesperson Deepak Kesarkar : गद्दार म्हणताना दहा वेळा विचार करावा; आम्ही बाळासाहेब, उद्धव ठाकरेंचा मान ठेवतो - दीपक केसरकर

हेही वाचा : Uddhav Thackeray Led Faction : शिवसेनेला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा झटका, शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान देणारी याचिका तातडीने घेण्यास नकार

Last Updated : Jul 9, 2022, 6:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.