नाशिक - शहरातील त्र्यंबक नाका येथील सेंट थॉमस चर्च ( Nashik Saint Thomas Charch Incident ) कमिटीमध्ये मतभेद झाल्याने फादर अनंत आपटे यांनी ( Father Anant Aapte Burt Himself ) स्वत:वर पेट्रोल टाकून चर्चमध्ये आत्महत्याचा प्रयत्न केला आहे. चर्च कमिटीने फादर यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केल्याने त्यांनी आत्महत्याचा (Father Anant Aapte Suicide Attempt ) प्रयत्न केला, अशी प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चमधील संघर्ष समोर आला आहे.
कार्पेटमध्ये गुंडाळून विझवली आग -
शहरातील त्र्यंबक नाका जवळ असलेल्या सेंट थॉमस चर्च येथे असलेले बिशप शरद गायकवाड हे मागील काही दिवसांपासून फादर अनंत आपटे यांना वेगवेगळ्या कारणाने त्रास देत होते आणि त्यांच्या छळ करत होते. याबाबत फादर गायकवाड यांच्या विरोधात आपटे यांनी मुख्य फादराकडे तक्रार देखील केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर हे प्रकरण वाढत गेले. दरम्यान, रविवारी ज्यावेळी सेंट थॉमस चर्चमध्ये प्रार्थना सुरू होती. त्याच वेळेस संतप्त झालेले फादर अनंत आपटे यांनी स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतले. ही घटना या ठिकाणी उपस्थितांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्या ठिकाणी असलेल्या कार्पेटमध्ये त्यांना गुंडाळून आग विझवली. या आगीत फादर अनंत आपटे गंभीर जखमी झाले आहेत.
जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल, १० टक्के भाजले -
चर्च कमिटीने बाजू मांडू न दिल्याने मानसिक तणावातून सेंट थॉमस चर्च त्र्यंबक नाका येथे महाधर्मगुरु शरद गायकवाड यांच्या समोर फादर अनंत आपटे यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला. रविवारची उपासना चालू असताना ही घटना घडली. उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून ते १० टक्के भाजले असल्याचा अंदाज आहे.