ETV Bharat / city

'तुला पप्पांनी बोलावले' म्हणून अल्पवयीन मुलीला बळजबरीने नेले लॉजवर; नराधमाने केले 'असे' दुष्कृत्य

author img

By

Published : Oct 10, 2021, 5:50 PM IST

नाशकातील अशाेका मार्गावरील शाळेजवळ उभ्या असलेल्या ओळखीच्या मुलीला ‘तुला तुझ्या पप्पांनी घरी बोलावले आहे, मी तुला घ्यायला आलो आहे.' असे म्हणूण स्वत:च्या कारमध्ये बसवून तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत लॉजवर नेले. येथे तिच्यावर बळजवरीने अंगलट करुन तिच्यासोबत अश्लिल स्थितीत मोबाईलवरुन सेल्फी फाेटाे घेतले.

Rape on minor girl in Nashik; accused was arrested by police
'तुला पप्पांनी बोलावले' म्हणून अल्पवयीन मुलीला बळजबरीने नेले लॉजवर; नराधमाने केले 'असे' दुष्कृत्य

नाशिक - अल्पवयीन मुलीला खाेटे बाेलून तिचे अपहरण करत एका नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अशाेका मार्ग परिसरात घडली. दरम्यान, पीडित मुलीने घरी येऊन आईला सर्व प्रकार सांगताच तिच्या नातेवाईकांनी संशयिताला जबर मारहाण केली आहे. त्याच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. याबाबत अपहरणासह पाेक्साे कायद्यान्वये संशयितावर मुंबई नाका पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागीरथ देशमुख यांची प्रतिक्रिया

तुला पप्पांनी बोलावले म्हणून कारमध्ये नेले लॉजवर -

दानिश अक्रम खान (२९. रा. रेहमत नगर, वडाळागाव, नाशिक) याने शनिवारी सकाळी साडेआठ ते पावणे अकरा वाजता घटनेतील पीडितेचा पाठलाग केला. ती अशाेका मार्गावरील शाळेजवळ उभी असताना दानिशने ‘तुला तुझ्या पप्पांनी घरी बोलावले आहे, मी तुला घ्यायला आलो आहे.' असे म्हणूण स्वत:च्या कारमध्ये बसवून तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत लॉजवर नेले. येथे तिच्यावर बळजवरीने अंगलट करुन तिच्यासोबत अश्लिल स्थितीत मोबाईलवरुन सेल्फी फाेटाे घेतले. याप्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरुन दानीशच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दानीश हा पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा ओळखीतील आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागीरथ देशमुख यांनी सांगितले. याबाबत अधिक तपास हे उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

हेही वाचा - टोमण्यांना वैतागून उचलले टोकाचे पाऊल; घरजावयाने केली सासू, पत्नीची गोळी झाडून हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.