ETV Bharat / city

नाशिक: दिवाळीनंतर चारच दिवसात डाळींच्या किंमतीत घसरण; खाद्यतेलाचे भाव वाढण्यास सुरुवात

दिवाळी संपल्यानंतर काही प्रमाणात दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसात तूर डाळी अजून स्वस्त होतील अशी चिन्हे आहेत. मात्र दुसरीकडे मात्र खाद्य तेलाचे दर भडकले आहेत.

डाळीचे दर न्यूज
डाळीचे दर न्यूज
author img

By

Published : Nov 21, 2020, 6:00 PM IST

नाशिक- दिवाळीनंतर चार दिवसात डाळी किमती कमी झाल्या आहेत. दिवाळीनंतर म्यानयारमधून मोठ्या प्रमाणात भारतात तूरडाळ आयात झाल्याने तूर डाळीच्या किंमती कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, दुसरीकडे खाद्यतेलाचे भाव वाढल्याचे चित्र आहे.

दिवाळीत डाळींचे दर 100 रुपये किलोहून अधिक झाले होते. दिवाळी संपल्यानंतर काही प्रमाणात दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसात तूर डाळी अजून स्वस्त होतील अशी चिन्हे आहेत. मात्र दुसरीकडे मात्र खाद्य तेलाचे दर भडकले आहेत.

खाद्यतेलाचे भाव वाढण्यास सुरुवात-

घरोघरी वापरले जाणारे सोयाबीन तेल 100 रुपयांवरून थेट 110 रुपये झाले आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे पामतेल 90 रुपयांवरून 95 रुपये लिटरवर जाऊन पोहोचले आहे. जगात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खाद्यतेलाची आयात कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर तेलाचे भाव पुढील काही दिवसात अधिक वाढतील अशी परिस्थिती आहे.

हेही वाचा-स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या तेलांविषयी हे आपल्याला माहिती आहे का?

दिवाळीत वाढले होते डाळींचे भाव
दिवाळीच्या सणासुदीच्या काळात विविध डाळींचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. यात प्रामुख्याने तूर डाळ 136 रुपये किलोपर्यंत पोहचली होती. तर मुग डाळ 120 रुपये आणि चनाडाळ 78 रुपयांवर जाऊन पोहचली होती. तूर डाळीच्या किंमती येणाऱ्या काही दिवसात अजून कमी होतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा-डाळीला महागाईचा 'तडका'; येत्या काही दिवसांत आणखी दर वाढण्याची चिन्हे

सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवावे- ग्राहकांची अपेक्षा
नाशिक शहरातील किरकोळ बाजारात तूर डाळ 110 रुपये किलो, मूग डाळ 100 रुपये किलो व चना डाळ 71 रुपये किलोने मिळत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळत आहे. मात्र, दुसरीकडे खाद्यतेलाचे वाढणारे भाव चिंतेचा विषय झाला आहे. येत्या काही दिवसात तेलाच्या किंमती अधिक वाढू शकेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. सरकारने महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्या, अशी ग्राहकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून डाळींचे मोफत वाटप-
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेमधून मेच्या महिल्या आठवड्यात डाळींचे मोफत वाटप करण्यात आले आहे. देशात ५.८८ लाख टन डाळीचा गरिबांना पुरवठा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्ववजनिक मंत्रालयाने यापूर्वी दिली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.