ETV Bharat / city

नाशिकच्या कैद्यांनी बनवल्या शाडूमातीच्या सुबक गणेश मूर्ती

author img

By

Published : Sep 4, 2021, 7:14 PM IST

Updated : Sep 4, 2021, 7:38 PM IST

कारागृहातील कैद्यांनी यंदा 540 शाडूमातीच्या गणेश मूर्ती केल्या आहेत. नागरिकांचा प्रतिसादही याला चांगला मिळत असून बहुतांश गणेश मूर्तींची आगाऊ नोंदणी झाली आहे.

nsk
शाडूमतीच्या सुबक गणेश मूर्ती

नाशिक - नाशिक कारागृहात कैद्यांनी यंदाही शाडूमातीच्या गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. नुकतेच या गणेश मूर्तीची विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या हस्ते नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहाच्या आवारात पार पडले. कारागृहातील कैद्यांनी यंदा 540 शाडूमातीच्या गणेश मूर्ती केल्या. नागरिकांचा प्रतिसादही याला चांगला मिळत असून बहुतांश गणेश मूर्तींची आगाऊ नोंदणी झाली आहे.

शाडूमतीच्या सुबक गणेश मूर्ती

एखाद्या चुकीमुळे हे कैदी शिक्षा भोगत असले तरीही त्यांच्यात चांगले कलागुण आहेत. आणि त्यांच्या याच कलागुणांना वाव देण्यासाठी कारागृह प्रशासन गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. कैद्यांनी बनविलेल्या वस्तूंच्या विक्रीतून लाखो रुपयांचा महसूल देखील प्राप्त झाला आहे. या वेळेस पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्यासह सह कारागृह अधीक्षक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

nashik
सुबक गणेश मूर्ती

11 इंचापासून 22 इंचापर्यंतच्या मूर्त्या
कैद्यांमुळेच कारागृहात मूर्ती बनविण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. सर्वात पहिले फ्रेंच कैद्याने कारागृहात मूर्ती तयार केली. त्यानंतर महाराष्ट्रातल्या कारागृह विभागात मूर्ती कलेची वाढ झाली असे प्रतिपादन कारागृहाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणे कैद्यांनी बनवलेल्या मूर्त्यांनी कारागृहाची बाजारपेठ सजली आहे. या मूर्ती पाहण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. यातून मोठा महसूल मिळणार असल्याचे तुरुंगाधिकारी व कारखाना व्यवस्थापक शामराव गीते यांनी स्पष्ट केले.

nashik
कैद्यांनी बनवल्या 540 मूर्त्या

कैद्यांनी बनवल्या 540 मूर्त्या

यंदा कोरोनामुळे 540 मूर्त्या कैद्यांनी बनवल्या आहेत. यात 11, 22 इंच तसेच तीन फूटापर्यंतच्या मूर्त्यांचा समावेश आहे. साडेसातशे रुपयांपासून ते पाच हजार रूपयांपर्यंत गणपती मूर्तींच्या किमती आहेत. सर्व मुर्ती शाडू मातीच्या असल्यामुळे निसर्गाला हानी पोहोचत नाही. शिवाय कैद्यांनी श्रम, कष्ट मेहनतीने मूर्त्या तयार केल्या आहेत.

nashik
डोळ्याची पारणे फेडणारी मूर्ती

हेही वाचा - नायर रुग्णालयाला 100 कोटी देणार; शताब्दी महोत्सवाप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

Last Updated : Sep 4, 2021, 7:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.